गूळ साखरेपेक्षा उत्तम, मग डायबिटीजचे रुग्ण खाऊ शकतात का? तज्ज्ञांनी दिलं उत्तर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Sugar Vs Jaggery : साखरेला पांढरं विष म्हणतात, मग गूळ तरी आरोग्यासाठी फायदेशीर असतो का? शुगर पेशंट गूळ खाऊ शकतात का? याबाबत अनेकजणांचा गोंधळ उडतो. हाच गोंधळ आज दूर करूया.
advertisement
1/8

अनेकजण म्हणतात की, साखरेपेक्षा गूळ बरा. साखर आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. मग शुगर पेशंट गूळ खाऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी साखर आणि गुळामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे.
advertisement
2/8
सामान्यपणे हिवाळ्यात गुळाचा वापर अधिक होतो. तर, उन्हाळ्यात साखरेचा वापर सर्वाधिक केला जातो.
advertisement
3/8
गूळ आणि साखर दोन्ही उसाच्या रसापासून तयार होतात. परंतु ते बनवण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. साखर बनवण्यासाठी जे ब्लिचिंग वापरतात त्यात केमिकल्सचाही वापर होतो. तर, गूळ पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं बनवला जातो.
advertisement
4/8
गूळ पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं बनवला जात असल्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. त्यात केमिकल्सचा वापर केला जात नाही.
advertisement
5/8
गुळात आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतं. शरीरातील रक्ताची कमतरता गुळामुळे भरून निघू शकते.
advertisement
6/8
डॉ. आशिष सांगतात की, गूळ पोटात हळूहळू मिसळतो, त्यामुळे ब्लड शुगर संतुलित राहते. तर साखर पोटात जलद गतीने मिसळते, ज्यामुळे ब्लड शुगर लवकर वाढते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, डायबिटीजचे रुग्ण गूळ खाऊ शकतात. त्यांच्यासाठी गुळाचं सेवन हे साखरेइतकंच हानीकारक असतं.
advertisement
7/8
गुळात सुक्रोजचे अणू, कार्बोहायड्रेट मिनिरल, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. तर, साखरेत केवळ कॅलरी जास्त असतात.
advertisement
8/8
आयुर्वेदानुसार, गुळात अँटीऍलर्जिक गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी, खोकल्यावर आराम मिळू शकतो. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यानं अन्नपचन व्यवस्थित होतं. तसंच शरीरातील टाकाऊ पदार्थही व्यवस्थित बाहेर पडतात. या सर्व कारणांमुळेच गूळ साखरेपेक्षा उत्तम मानतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
गूळ साखरेपेक्षा उत्तम, मग डायबिटीजचे रुग्ण खाऊ शकतात का? तज्ज्ञांनी दिलं उत्तर