TRENDING:

garlic health benefits : रात्री झोपताना लसूण खाल्ल्यावर नेमका काय होतं, आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Last Updated:
Health Tips : स्वयंपाकात लसणाचा वापर केला जातो. मात्र, लसणाचे इतरही अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. हेच आपण जाणून घेऊयात. तज्ज्ञांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली. (आदित्य आनंद/गोड्डा, प्रतिनिधी)
advertisement
1/5
रात्री झोपताना लसूण खाल्ल्यावर नेमका काय होतं, आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं कारण
गोड्डा येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. जेपी भगत यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, यात अँटिऑक्टिडंट आणि अँटी बॅक्टेरिअल गुण असल्याने शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते. पोटाचे आजारही होत नाहीत. रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
advertisement
2/5
हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण खाणे फायदेशीर आहे. यातील अ‍ॅलिसिन घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. नियमितपणे लसणाचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांही मजबूत होतात. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयावरील दबाव कमी होतो.
advertisement
3/5
लसणात व्हिटामिन C, व्हिटामिन B6 आणि सेलेनियम सारखे महत्त्वपूर्ण पोषक तत्त्वे असतात. यामुळे इम्यूनिटी वाढते. यामुळे विविध आजारांचा सामना करताना मदत होते. व्हिटामिन C एक शक्तिशाली अँटीऑक्सीडेंटच्या रुपात कार्य करतो. जे पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावते. व्हिटॅमिन B6 आणि सेलेनियम शरीराच्या विविध एंजाइमॅटिक प्रतिक्रियांमध्ये सहकार्य करतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती अधिक प्रभावीपणे कार्य करते.
advertisement
4/5
लसणात सल्फर यौगिक असल्याने अॅलिसिन नैसर्गिक पद्धतीने शरीर आणि मेंदूला शांत करण्यात मदत करते. यामध्ये तणाव कमी करण्याचीही क्षमता आहे. यामुळे मनाला शांती मिळते. यामुळे अनिद्रेचीही समस्या सुटेल. झोपेच्या वेळी लसणाचे सेवन करणे किंवा उशाच्या खाली ठेवणे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते आणि यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
advertisement
5/5
तसेच लसूण शरिरातील विषारी तत्त्व (टॉक्सिन्स) काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. लसणाचे सेवनाने यकृतही आरोग्यदायी राहते. लसूणचे सेवन केल्याने यकृताची डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया नियमितपणे वाढते. यामुळे शरीर विषमुक्त आणि निरोगी राहते. (सूचना : या बातमीमध्ये दिलेली माहिती ही तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
garlic health benefits : रात्री झोपताना लसूण खाल्ल्यावर नेमका काय होतं, आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल