
मुंबई : खाद्यपदार्थांमध्ये आरोग्यदायी पर्यायांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी ग्रो हेल्दी फूड या फूड ब्रँडने हेल्दी तसेच मिलेट-आधारित खाद्यपदार्थांची आकर्षक श्रेणी बाजारात आणली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मैदा, जास्त तेल आणि कृत्रिम घटकांमुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून हा ब्रँड 100 टक्के नैसर्गिक, पौष्टिक आणि पारंपरिक धान्यांवर आधारित पदार्थ उपलब्ध करून देत आहे.