आता वजन कमी करण्याचं नो टेन्शन, हा आहे चरबी वितळवण्याचा सर्वात सोपा उपाय!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल वजन कमी करणं हा अनेकजणांसमोर जणू टास्कच असतो. काहीजणांचं वजन तर काही केल्या कमी होतच नाही, मग नेमकं करावं तरी काय, असा त्यांच्यासमोर मोठा प्रश्नच असतो. आज आपण वजन कमी करण्यासाठी एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5

आपण सलाडमध्ये काकडी खातो. ही काकडीच आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असते. काकडीतून शरीराला अगदी चमत्कारिक फायदे मिळतात. जसं की, त्वचा तजेलदार होते, पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. तसंच काकडीमुळेच वजन कमी होण्यासही मदत मिळते.
advertisement
2/5
काकडीत 95% पाणी असतं, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. आपण सलाडमधून काकडी खाऊच शकता, अनेकजणांना नुसती काकडी खायलाही आवडते.
advertisement
3/5
काकडीत कॅलरीचं प्रमाण कमी असतं. तसंच काकडीमुळे भूक कमी लागण्यासही मदत मिळते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकतं. तसंच चेहऱ्यावर छान तेज येतं आणि आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
4/5
काकडीमुळे अन्नपचन सुरळीत होतं. रक्तातलं साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहतं. काकडीत असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडं भक्कम होण्यास मदत मिळते.
advertisement
5/5
महत्त्वाचं म्हणजे काकडीमुळे किडनीही स्वच्छ राहू शकते. परिणामी किडनीसंबंधित आजारांचा धोका कमी होतो. काकडीत अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरभरून असतात, जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
आता वजन कमी करण्याचं नो टेन्शन, हा आहे चरबी वितळवण्याचा सर्वात सोपा उपाय!