उन्हाळ्यात कोणता माठ चांगला, लाल, काळा की पांढरा? कोणत्या माठात लवकरच होतं पाणी गार!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
फ्रिजपेक्षा पारंपरिक मातीच्या माठातील पाण्याला सर्वांची पसंती असते. त्यामुळे अनेकजण बाजारातून मातीचे माठ घरी घेऊन येतात.
advertisement
1/7

उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच थंडगार पाणी हवं असतं. फ्रिजपेक्षा पारंपरिक मातीच्या माठातील पाण्याला सर्वांची पसंती असते. त्यामुळे अनेकजण बाजारातून मातीचे माठ घरी घेऊन येतात.
advertisement
2/7
परंतु, बाजारात तीन प्रकारचे माठ दिसतात. बऱ्याचदा लाल मातीचा की काळ्या मातीचा कोणत्या रंगाचा माठ घ्यावा? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी याबाबत माहिती दिलीये.
advertisement
3/7
सध्याच्या काळात उन्ह तापलं असून बाजारात माठांची दुकाने सजलेली दिसत आहेत. विविध आकारांसोबतच विविध रंगाचे माठ देखील दिसत आहेत. अनेक ठिकाणी काळ्या आणि लाल माठासोबत पांढरे माठ देखील दिसत आहेत. त्यामुळे कोणता माठ घ्यावा? याबाबत बऱ्याचदा संभ्रम निर्माण होतो. पण, मातीचा कोणताही माठ वापरणं लाभदायी असतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
4/7
काळा रंग हा उष्णता लगेच शोषून घेतो. त्यामुळे काळ्या माठातील पाणी लवकर थंड होते. ते शरीरासाठी देखील चांगले असते. त्यामुळे काळ्या माठाला मोठी मागणी असते. तसेच लाल आणि पांढऱ्या माठातील पाणी देखील चांगलं असतं.
advertisement
5/7
परंत, हे माठ घेताना तपासून घेतले पाहिजेत. कारण काही ठिकाणी माठ बनवताना त्यात सिमेंट वापरले जाते. त्यामुळे काळजीपूर्वक बघूनच कोणत्याही रंगाचा माठ घ्यावा, असं मठाळकर सांगतात.
advertisement
6/7
सध्याच्या काळात मातीच्या माठात सिमेंट मिसळल्याचे प्रकार पुढे येत आहेत. अशा वेळी योग्य ती खात्री करूनच माठ खरेदी करणं गरजेचं आहे. त्यामुळे माठ घेताना त्याचं वजन तपासावं. मातीचे माठ हे वजनाला हलके असतात. तर सिमेंट मिश्रित माठ हे वजनाने जड असतात. तसेच सिमेंट मिश्रित माठातील पाणी देखील मातीच्या माठा इतकं चांगलं नसतं. त्यामुळे थंड आणि आरोग्यदायी पाण्यासाठी मातीचा माठ निवडावा.
advertisement
7/7
दरम्यान, काळा, लाल किंवा पांढरा कोणत्याही मातीचा माठ पाण्यासाठी चांगला ठरतो. परंतु, काळ्या माठात पाणी लवकर आणि अधिक थंड होतं. तसेच लाल आणि पांढऱ्या मातीच्या माठातील पाणी तुलनेनं कमी थंड असतं, असं मंजू मठाळकर सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात कोणता माठ चांगला, लाल, काळा की पांढरा? कोणत्या माठात लवकरच होतं पाणी गार!