बहिणीचा मृत्यू, मग तिच्याच नवऱ्याशी लग्न; ज्याला ठेवली नाव त्यामुळेच एका रात्रीत सुपरस्टार झाली अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हिंदी सिनेमाची सुपरस्टार अभिनेत्री, जिला बहिणीच्या नवऱ्याशी लग्न करण्याची आली वेळ. कोण आहे ही?
advertisement
1/7

हिंदी सिनेसृष्टीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष करून नावारूपाला आल्या. अशीच एक अभिनेत्री जीला तिच्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्याच नवऱ्याशी लग्न करावं लागलं. अनेक वर्ष ती ज्या गोष्टीला नाव ठेवत होती. अखेर त्याचमुळे ती एका रात्रीत सुपरस्टार अभिनेत्री झाली. कोण आहे ही?
advertisement
2/7
1946 साली प्रदर्शित झालेल्या नीचा नगर या सिनेमातून तिनं पदार्पण केलं. ही अभिनेत्री म्हणजे कामिनी कौशल. अभिनयाच्या जगात येण्याचा कधीही विचार नसताना केवळ योगायोग, कुटुंबाची मोकळी विचारसरणी आणि मेहनतीमुळे कामिनी कौशल हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर नाव ठरल्या.
advertisement
3/7
कामिनी कौशल यांचं खरं नाव उमा कश्यप होतं. त्यांचे वडिल प्रा. शिव राम कश्यप हे लाहोरमधील प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ होते. सिनेमात यायचं त्यांनी कधीच ठरवलं नव्हतं.
advertisement
4/7
वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी त्यांच्या भावाने ‘द ट्रॅजेडी’ नावाचा एक छोटा सिनेमा तयार केला. गंमत म्हणून कामिनींना त्यात मुख्य भूमिका देण्यात आली. त्यांनी हे सगळं मजा म्हणून केलं होतं.
advertisement
5/7
दिग्दर्शक चेतन आनंद हे कामिनींच्या भावाचे जवळचे मित्र होते. लाहोरमध्ये आल्यानंतर त्यांनी कामिनींना थेट विचारले की, “तू माझ्या सिनेमा काम करशील का?” कामिनींनी सुरुवातीला नकार दिला. त्यांना चित्रपटात काम करणं योग्य वाटत नव्हतं. भाऊ आणि कुटुंबाच्या फोर्समुळे त्यांनी सिनेमालाहो म्हटलं. त्यांच्या वडिलांचा एकच नियम होता – नवीन गोष्टींसाठी कधीच ‘नाही’ म्हणायचं नाही.
advertisement
6/7
यानंतर कामिनी कौशल यांना नीचा नगर या सिनेमात भूमिका मिळाली. चेतन आनंद दिग्दर्शित हा सिनेमा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स (पाल्मे डी’ओर) जिंकणारा भारतातील पहिला सिनेमा ठरला. या सिनेमामुळे कामिनी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि त्या एका रात्रीत सुपरस्टार झाल्या.
advertisement
7/7
1947 साली कामिनी यांच्या आयु्ष्यात मोठी उलथापालथ झाली. ती म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबाच्या इच्छेनुसार 1948 मध्ये कामिनींनी बहिणीच्या पतीशी, बी.एस. सूद यांच्याशी लग्न केलं. प्रेमापेक्षा कर्तव्य आणि जबाबदारीपोटी त्यांनी हे लग्न केलं. बहिणीच्या दोन मुलींसह त्यांनी स्वतःच्या मुलांना वाढवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बहिणीचा मृत्यू, मग तिच्याच नवऱ्याशी लग्न; ज्याला ठेवली नाव त्यामुळेच एका रात्रीत सुपरस्टार झाली अभिनेत्री