TRENDING:

झोप पूर्ण झाली तरी डोळ्याखाली काळी वर्तुळं राहतात का? आजच आहारात करा बदल, मिळेल फायदा

Last Updated:
अनेकजण डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांमुळे चिंतेत असतात. कारण संपूर्ण चेहरा गोरा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे बघायला व्यवस्थित दिसत नाही.
advertisement
1/5
झोप पूर्ण झाली तरी डोळ्याखाली काळी वर्तुळं राहतात का? आजच आहारात करा बदल
अनेकजण डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांमुळे चिंतेत असतात. जास्तीत जास्त तरुण वर्ग या समस्येमुळे त्रस्त आहे. कारण संपूर्ण चेहरा गोरा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे बघायला व्यवस्थित दिसत नाही.
advertisement
2/5
पण, ही समस्या नेमकी होते कशामुळे? काही वेळा म्हणतात की पुरेशी झोप न झाल्याने ही समस्या होत असेल. पण एरवी सुद्धा अनेकांना ही समस्या निर्माण होते. व्हिटॅमिनच्या कमीमुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, असे डॉक्टर सांगतात. यासाठी आहारात कशाचा समावेश करावा? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
3/5
याबाबत माहिती देताना डॉ. टाकरखेडे सांगतात की, सद्यस्थितीमध्ये तरुण वर्गाला अनेक त्वचेच्या समस्या उद्भवत आहे. यामागचे कारण आहे बाहेरील अन्नपदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करणे. त्याचबरोबर रसायनयुक्त भाजीपाला आणि इतर पदार्थ. त्याचबरोबर बदलती जीवनशैली. यासर्व बाबींमुळे आपल्या आंतरिक आणि बाहेरील आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.
advertisement
4/5
डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे व्हिटॅमिन B12 आणि आयरनच्या कमतरतेमुळे येतात. त्यामुळे आहारात खजूर, शेवग्याच्या शेंगा आणि पालक याचा समावेश करावा. त्याचबरोबर स्क्रीन टाईमसुद्धा कमी करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत नको ते बदल न करता पाहिजे ते बदल केल्यास आरोग्य सुखदायी होते.डोळ्यांखालील काळी वर्तुळे आल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यांच्या सल्ल्याने काही व्हिटॅमिंस टॅब्लेट तुम्ही घेऊ शकता. सकाळी उठल्यापासून आपले दैनंदिन रूटीन व्यवस्थित फॉलो केल्यास सुद्धा अनेक आजार टाळता येतात.
advertisement
5/5
बाहेरील अन्न पदार्थ खाणे बंद केल्यास आणि दररोज सकाळी एक ॲपल आहारात घेतल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. कोणत्याही आजारावर घरगुती उपाय न करता सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणतीही हानी पोहचणार नाही, असे डॉ. अनुराधा यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
झोप पूर्ण झाली तरी डोळ्याखाली काळी वर्तुळं राहतात का? आजच आहारात करा बदल, मिळेल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल