Heavy Breakfast Benefits : सकाळचा नाश्ता म्हणजे शरीराची बॅटरी! फायदे माहिती पडले तर कधीच करणार नाहीत स्कीप
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Heavy Breakfast Benefits : सकाळचा नाश्ता हा तुमच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, हे समजल्यावर तुम्ही पुन्हा कधीच तो स्किप करणार नाही.
advertisement
1/9

सकाळी ऑफिसला किंवा कॉलेजला जायची घाई असते आणि अशा वेळी बऱ्याचजणांना वाटतं "चला, आज नाश्ता टाळूया!" डायरेक्ट जेवण करु. पण तुम्हीही जर असंच करत असाल, तर थांबा! कारण सकाळचा नाश्ता हा तुमच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, हे समजल्यावर तुम्ही पुन्हा कधीच तो स्किप करणार नाही.
advertisement
2/9
आपल्या संस्कृतीत एक म्हण आहे. "सकाळी राजासारखं खा, दुपारी मध्यमवर्गीयासारखं आणि रात्री भिकाऱ्यासारखं!" यामागे शास्त्रीय कारणंही आहेत. झोपेतून उठल्यानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी भरपेट नाश्ता आवश्यक असतो. तो तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठीही फायदेशीर असतो.
advertisement
3/9
नाश्ता का आवश्यक आहे?1. नाश्ता सुरू करतो तुमचं चयापचय (metabolism):सकाळचा नाश्ता तुमच्या शरीराचं चयापचय सुरू करतो. त्यामुळे अन्न पचन, ऊर्जा निर्मिती आणि पोषणशक्ती व्यवस्थित कार्य करते.
advertisement
4/9
2. ‘अग्नी’ प्रज्वलित ठेवणं गरजेचं:आयुर्वेदात पाचनशक्तीला ‘अग्नी’ म्हटलं जातं. अग्नी म्हणजे शरीरातील उष्णता जी पचन आणि चयापचय क्रियांना चालना देते. जर अग्नी मंद झाला, तर शरीर अशक्त होऊ लागते. त्यामुळे सकाळचा नाश्ता ही अग्नी प्रज्वलित ठेवण्याची पहिली पायरी आहे.
advertisement
5/9
3. नाश्ता केल्यावर भूक कमी लागते:ज्यांना वाटतं नाश्ता न केल्याने वजन कमी होईल, त्यांनी हे लक्षात ठेवावं सकाळी फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेला नाश्ता केल्यास दिवसभर भूक कमी लागते. उलट, नाश्ता टाळल्यास दिवसभरात अनारोग्यदायक खाणं वाढतं.
advertisement
6/9
4. स्मरणशक्ती वाढते:नाश्त्यातील कार्बोहायड्रेट्स मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. भरपूर नाश्ता केल्यास लक्ष केंद्रित होतं, स्मरणशक्ती सुधारते आणि चिडचिड कमी होते.
advertisement
7/9
5. लठ्ठपणाचा धोका कमी होतो:संशोधनातून असं दिसून आलं आहे की नियमित नाश्ता करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका कमी असतो.
advertisement
8/9
सकाळचा नाश्ता केवळ पोट भरण्यापुरता नसून तो तुमच्या आरोग्याचा पाया आहे. म्हणूनच, कितीही घाई झाली तरी दिवसाची सुरुवात भरपेट आणि संतुलित नाश्त्यानेच करा!
advertisement
9/9
( नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत फक्त माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Heavy Breakfast Benefits : सकाळचा नाश्ता म्हणजे शरीराची बॅटरी! फायदे माहिती पडले तर कधीच करणार नाहीत स्कीप