TRENDING:

Air Cooler : कुलरच्या टाकीतून पाणी गळतंय? फक्त एक रुपयात करा ठीक, नाही लागणार रिपेयरिंगची गरज

Last Updated:
अनेकदा घरातील कुलर जुना झालेला असेल तर त्यातून पाणी गळत. अशावेळी त्याच रिपेअरिंग करायचं म्हंटल तर ते खूप खर्चीक ठरतं. अशावेळी तुम्ही फक्त एक रुपयात ते ठीक करू शकता.
advertisement
1/5
कुलरच्या टाकीतून पाणी गळतंय? फक्त एक रुपयात करा ठीक, नाही लागणार रिपेयरिंगची गरज
उकाड्याची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. अशातच उष्णता आणि गरम वारं यापासून बचाव करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू आहे. कित्येक घरांमध्ये दिवसरात्र कूलरचा वापर सुरू झाला आहे. पण तुमचा कूलर जर जुना असेल तर काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात. अ‍ॅल्युमिनियम बॉडी असलेला कूलर ज्यांच्या घरी असेल आणि त्या कूलरमध्ये जर काही बिघाड झाल्यासारखा वाटत असेल तर पहिला प्रश्न असतो तो गंज लागण्याचा. गंज लागण्यामुळे या कूलरचा बाह्य भाग जागोजागी तुटल्यासारखा किंवा तुकडे पडल्यासारखा दिसू लागतो. बऱ्याचवेळा याच्या टाकीतून पाणी गळू लागतं.
advertisement
2/5
मग अशावेळी कूलरची बॉडी बदलण्याचा विचार केला जातो. तर काही लोक कूलरची टाकी बदलण्यासाठी दुरुस्तीला देतात. पण आम्ही एक जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यातून फक्त एक रुपायात ही टाकी गळण्याचा त्रास तुम्ही थांबवू शकता. इथं ती एक रुपयात मिळणारी वस्तू म्हणजे च्युईंगम. हो. च्युईंगमच्या मदतीने गळणाऱ्या कूलरची टाकी दुरुस्त करता येते.
advertisement
3/5
यासाठी सगळ्यात आधी टाकीतलं सगळं पाणी काढून, ती रिकामी करून कोरडी होऊ द्यावी लागेल. त्यानंतर गळतीनुसार जितकं आवश्यक असेल त्याप्रमाणे च्युईंगम घेऊन ते चावा. मग टाकीच्या बाहेरच्या बाजूला जिथे छिद्र असेल त्यावर ते च्युईंगम चिकटवून टाका आणि काही तास ते तसंच राहू द्या. च्युईंगम टाकीवर चिकटल्यानंतर काही वेळानं ते खूप कडक झाल्याचं लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही कूलरच्या टाकीत पाणी भरू शकता.
advertisement
4/5
लक्षात ठेवा की, च्युईंगमचा हा घरगुती उपाय म्हणजे कायमस्वरूपी पर्याय नव्हे. जर तुम्हाला दीर्घकाळासाठी टाकीची गळती दुरुस्त करून घ्यायची असेल तर एम-सील किंवा तत्सम उत्पादनं वापरून गळती थांबवावी लागेल. बाजारात या वस्तू सहज उपलब्ध होऊ शकतात.
advertisement
5/5
अनेक घरांमध्ये कोणत्याही गळक्या वस्तूचा वापर करणं टाळलं जातं. मग ते पाणी पिण्याची भांडी असोत, साठवणुकीची भांडी असोत वा कूलरच्या टाकीसारखी वस्तू असो. पाण्याची गळती होत असेल तर एकूण घराच्या शांतता आणि समृद्धीसाठी ते योग्य नसल्याची अनेकांची धारणा असते. त्यामुळे तात्पुरता घरगुती उपाय म्हणून च्युईंगम सहज उपलब्ध होऊन तातडीनं वापरता येईल. पण दीर्घकाळाच्या दुरुस्तीसाठी एम-सील सारखी साधनं वापरून उपाय करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Air Cooler : कुलरच्या टाकीतून पाणी गळतंय? फक्त एक रुपयात करा ठीक, नाही लागणार रिपेयरिंगची गरज
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल