TRENDING:

Paneer : दिवाळीच्या काळात पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, तुम्ही खाण्याचा विचार करत असाल, तर आधी हे नक्की करा

Last Updated:
दिसायला अगदी ताजं आणि मऊ वाटणारं पनीर खरं असतंच असं नाही. अशा वेळी आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून असली आणि नकली पनीर यातील फरक ओळखणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया काही सोपे घरगुती उपाय.
advertisement
1/7
दिवाळीच्या काळात पनीरमध्ये भेसळ, तुम्ही खाण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की करा
सणासुदीचा काळ आला की बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी आणि गजबज दिसते. दिवाळीच्या खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात मिठाई, सुका मेवा आणि दुग्धजन्य पदार्थ घेतात. पण या वाढत्या मागणीचा फायदा काही बेईमान विक्रेते उचलतात. अशावेळी अनेकदा नकली किंवा भेसळयुक्त पदार्थ बाजारात येतात. त्यात सर्वात जास्त फसवणूक होते ती पनीरमध्ये.
advertisement
2/7
दिसायला अगदी ताजं आणि मऊ वाटणारं पनीर खरं असतंच असं नाही. अशा वेळी आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून असली आणि नकली पनीर यातील फरक ओळखणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया काही सोपे घरगुती उपाय.
advertisement
3/7
१. गरम पाण्याने ओळखा पनीर खरं की खोटंथोडं पनीर घेऊन ते गरम पाण्यात टाका. जर ते पाणी थोड्या वेळात वितळायला लागलं, तर समजा ते नकली आहे. असं पनीर बहुधा व्हेजिटेबल ऑइलपासून बनवलेलं असतं आणि ते गरम पाण्यात लगेच विरघळतं. अस्सल पनीर मात्र पाण्यात विरघळत नाही.
advertisement
4/7
२. टेक्स्चरवरून ओळखा फरकअस्सल पनीर मऊ, क्रीमी आणि हलकं असतं. ते हातात घेतल्यावर लगेच तुटतं आणि खाण्यात सहज विरघळतं. उलट नकली पनीर घट्ट, रबरासारखं आणि चावताना ताणलं जातं, त्यामुळे त्याचा स्वाद आणि टेक्स्चर दोन्ही विचित्र वाटतात.
advertisement
5/7
३. सुगंध आणि चिकटपणा तपासाअस्सल पनीरमधून हलका दूधासारखा सुगंध येतो आणि ते कापताना थोडं ग्रीसी (चिकट) जाणवतं. नकली पनीर मात्र कोरडं आणि वासविरहित असतं. पनीरला हाताने चुरडा केल्यास ते सहज पिठ होत असेल, तर ते अस्सल आहे.
advertisement
6/7
४. आयोडिन टिंचर टेस्ट कराहा थोडा वैज्ञानिक पण सोपा उपाय आहे. थोडं पनीर उकळवून थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात काही थेंब आयोडिन टिंचरचे टाका. जर त्या पाण्याचा रंग निळा किंवा काळा झाला, तर पनीर नकली असल्याचं संकेत आहे.
advertisement
7/7
दिवाळीच्या उत्साहात आरोग्याशी तडजोड होऊ नये म्हणून अशा साध्या पद्धती वापरून असली पनीर ओळखा आणि भेसळमुक्त अन्नाचा आनंद घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Paneer : दिवाळीच्या काळात पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, तुम्ही खाण्याचा विचार करत असाल, तर आधी हे नक्की करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल