TRENDING:

Radish Pickle Recipe : घरी सहज बनवता येते हेल्दी आणि टेस्टी मुळ्याचे लोणचे, एकदा बनवा आणि 6 महिने खा!

Last Updated:
How to make radish pickle at home : लोणचं खायला सगळ्यांनाच आवडतं, पण हिवाळ्याच्या दिवसांत जेवणासोबत मुळ्याचं लोणचं मिळालं तर चव आणखीनच वाढते. गरमागरम पराठ्यांसोबत मुळ्याचं लोणचं जवळजवळ सगळ्यांनाच आवडतं. मात्र अनेकांना बाजारात मिळणारं लोणचं आवडत नाही. म्ह्णूनच आज आम्ही तुम्हाला मुळ्याचं लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरीच चविष्ट आणि आरोग्यदायी मुळ्याचं लोणचं तयार करू शकता.
advertisement
1/7
घरी सहज बनवता येते हेल्दी आणि टेस्टी मुळ्याचे लोणचे, एकदा बनवा आणि 6 महिने खा!
हिवाळ्यात जेवणाची मजा तेव्हा दुप्पट होते, जेव्हा ताटात लोणचं वाढलं जातं. साधं लोणचं तर सगळेच खातात, पण गरमागरम पराठ्यांसोबत मुळ्याचं लोणचं मिळालं तर चव आणखी खास होते. अनेकांना बाजारात मिळणारं लोणचं आवडत नाही, त्यामुळे घरी बनवलेलं मुळ्याचं लोणचं हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो. आज आम्ही तुम्हाला मुळ्याच्या लोणच्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरीच सहज तयार करू शकता आणि हे लोणचं अनेक महिन्यांपर्यंत खराबही होत नाही. खास बाब म्हणजे मुळ्याचं लोणचं चवीसोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानलं जातं आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये रामबाण ठरतं.
advertisement
2/7
हिवाळ्यात ताज्या मुळ्यांपासून बनवलेलं लोणचं जेवणासोबत इतकं चविष्ट लागतं की, एकदा बनवून ठेवलं तर रोज खायची इच्छा होते. मुळ्याचं लोणचं बनवण्यासाठी फारशी सामग्रीही लागत नाही. फक्त काही बेसिक मसाले, थोडं मोहरीचं तेल आणि व्हिनेगर वापरून चवीनं भरलेलं देशी मुळ्याचं लोणचं सहज तयार होतं. हे लोणचं केवळ बनवायला सोपं नाही तर चवीला देखील अतिशय भन्नाट असतं.
advertisement
3/7
मुळ्याचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम मुळे नीट धुऊन कोरडी करून घ्या. त्यानंतर मुळे सोलून पातळ, लांब आणि गोल आकाराचे तुकडे करा. आता कापलेल्या तुकड्यांमध्ये दोन चमचे मीठ घालून चांगलं मिसळा आणि दोन ते तीन तास उन्हात ठेवा. त्यानंतर मुळ्यांतून निघालेलं पाणी फेकून द्या आणि पुन्हा सुमारे एक तास उन्हात ठेवून नीट वाळवा. याच दरम्यान तुम्ही लोणच्यासाठी मसाला तयार करू शकता.
advertisement
4/7
मुळ्याचं लोणचं बनवण्यासाठी फारसे मसाले लागत नाहीत. यासाठी सर्वप्रथम कढईत मेथी दाणे, ओवा आणि जिरे घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर हे कढईतून काढून थंड होऊ द्या आणि मग वाटून मसाला तयार करा. आता एका कढईत मोहरीचं तेल घालून चांगलं तापवा. तेलातून सुगंध येऊ लागला की त्यात मुळे घाला आणि सुमारे 2 मिनिटे हलकं परतून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
advertisement
5/7
यानंतर मुळ्यांमध्ये मसाले मिसळा. सर्वप्रथम दोन छोटे चमचे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि दोन चिमूट हिंग घाला. आता यात भाजलेले आणि वाटलेले मसाले घालून चांगलं मिसळा. एवढं केल्यावर चविष्ट मुळ्याचं लोणचं तयार होतं. काही लोकांना व्हिनेगर आवडत नाही, अशा वेळी तुम्ही मुळ्याच्या लोणच्यात बारीक केलेली खटाई घालू शकता. यामुळे लोणच्याची चव थोडी आंबट आणि आणखी उत्तम होते.
advertisement
6/7
मुळ्याचं लोणचं पूर्णपणे थंड झाल्यावर ते स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बरणीत भरा. त्यानंतर बरणी 2-3 दिवस उन्हात ठेवा, यामुळे लोणच्यातील मसाल्यांची चव चांगली मुरते आणि चव आणखी वाढते. तसे पाहता तुम्ही हे लोणचं त्याच दिवशीही खाऊ शकता, पण याची खरी आणि अप्रतिम चव 3 दिवसांनी येते. मुळ्याचं लोणचं गरमागरम पराठे, पुरी किंवा वरण-भातासोबत खूपच छान लागतं.
advertisement
7/7
हिमांशी तिवारी यांनी माहिती देताना सांगितलं की, मुळ्याचं लोणचं बनवणं केवळ सोपंच नाही, तर ते घरात उपलब्ध असलेल्या साध्या मसाल्यांपासूनच तयार करता येतं. हिवाळ्याच्या काळात मुळ्याचं लोणचं बनवणं अतिशय फायदेशीर मानलं जातं. बहुतांश लोकांना मुळ्याचं लोणचं यासाठीही आवडतं कारण ते पोटाशी संबंधित समस्यांमध्ये खूप लाभदायक ठरतं. तुम्हालाही मुळ्याचं लोणचं खायला आवडत असेल, तर या सोप्या रेसिपीच्या मदतीने घरीच चविष्ट मुळ्याचं लोणचं तयार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Radish Pickle Recipe : घरी सहज बनवता येते हेल्दी आणि टेस्टी मुळ्याचे लोणचे, एकदा बनवा आणि 6 महिने खा!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल