TRENDING:

पांढरे झालेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या; बॉलिवूडच्या हँडसम हंकला हे काय झालं? ओळखणंही कठीण, PHOTO VIRAL

Last Updated:
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला आहे.
advertisement
1/7
पांढरे झालेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या; बॉलिवूडच्या हँडसम हंकला हे काय झालं?
बॉलीवूडचा अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहम सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. जॉनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून चाहत्यांना अक्षरशः धक्का बसला आहे.
advertisement
2/7
नेहमी दाढी, पिळदार मिश्या आणि रफ-टफ लूकमध्ये दिसणारा जॉन या फोटोत चक्क क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसत आहे. पण त्याचा हा बदल चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही. अनेकांनी तर त्याला पाहून विचारलंय, "जॉनची ही काय अवस्था झाली आहे?"
advertisement
3/7
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये जॉन आपल्या टीमसोबत पोझ देताना दिसत आहे. त्याने साधा काळा टी-शर्ट घातला आहे, पण सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या त्याच्या चेहऱ्याकडे. जॉनने दाढी पूर्णपणे काढली आहे, त्याचे केस पांढरे दिसत आहेत आणि त्याचा चेहरा आधीपेक्षा बराच ओढल्यासारखा किंवा बारीक वाटतोय.
advertisement
4/7
त्याच्या चेहऱ्यावर वयाच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. टीमच्या सदस्यांचा हात धरलेला हा जॉन पूर्वीपेक्षा जास्त रिलॅक्स्ड दिसत असला, तरी चाहत्यांनी मात्र त्याची तुलना त्याच्या जुन्या लूकशी करायला सुरुवात केली आहे. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे.
advertisement
5/7
एका युजरने विचारलं, "जॉन आजारी आहे का? तो इतका थकलेला का दिसतोय?" तर दुसऱ्याने म्हटलं, "कदाचित खूप वजन कमी केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत." काही फॅन्सनी तर जॉनला विनंती केली की, "प्लीज तुझी ती जुनी दाढी पुन्हा वाढव, क्लीन शेव्हमध्ये तू ओळखूच येत नाहीयेस!"
advertisement
6/7
अर्थात, काही जण जॉनच्या बाजूनेही उभे राहिले. एका चाहत्याने ट्रोलर्सना सुनावलं, "तो ५४ वर्षांचा आहे. वय वाढल्यावर शरीरात बदल होतातच. त्याला जज करणं थांबवा. तो अजूनही तितकाच ग्रेट आहे!"
advertisement
7/7
जॉनच्या या बदलामागे त्याच्या आगामी चित्रपटाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच त्याने 'तेहरान'मध्ये एका स्पेशल ऑफिसरची भूमिका साकारली होती. आता चर्चा आहे की, जॉन माजी आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये दिसू शकतो. कदाचित त्या भूमिकेसाठीच त्याने हा नॅचरल लूक स्वीकारला असावा. याशिवाय 'फोर्स ३' बद्दलही हालचाली सुरू आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पांढरे झालेले केस, चेहऱ्यावर सुरकुत्या; बॉलिवूडच्या हँडसम हंकला हे काय झालं? ओळखणंही कठीण, PHOTO VIRAL
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल