IND vs NZ : संजूला शेवटचा चान्स, बॅट चालली नाही तर बेंचवर बसावं लागणार, वर्ल्डकपसाठी रिप्लेसमेंट ठरली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा आणि पाचवा टी20 सामना 31 जानेवारी 2026 ला तिरूवनन्तपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडिअमवर खेळणार आहे.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा आणि पाचवा टी20 सामना 31 जानेवारी 2026 ला तिरूवनन्तपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडिअमवर खेळणार आहे.
advertisement
2/7
हा सामना टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसनच्या होम ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. त्यात या मालिकेत संजूची बॅट तळपली नाही आहे.त्यामुळे पाचव्या टी20 सामन्यात संजूला स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी आहे.
advertisement
3/7
संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यात अपयशी ठरला होता. कारण 4 सामन्यात त्याने फक्त 40 धावा केल्या आहेत. संजूने पहिल्या सामन्यात 10, दुसऱ्यात 6 आणि तिसऱ्यात शून्य आणि चौथ्या सामन्यात 24 धावा केल्या होत्या.
advertisement
4/7
संजूला टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून संघात घेतलं आहे.मात्र फलंदाजीत तो फारशी कामगिरी करताना दिसला नाही आहे. आता शेवटचा टी20 सामना संजूच होमग्राऊंवर तिरूवनन्तपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे.
advertisement
5/7
जर या शेवटच्या सामन्यातही संजूची बॅट चालली नाही तर त्याचा टी20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण टी20 वर्ल्ड कपच्या आधी ही शेवटची सिरीज आहे.
advertisement
6/7
संजू सॅमसनच्या जागी ईशान किशन त्यांची जागा ओपनिंगला घेण्याची शक्यता आहे. जर ईशानची ओपनिंगला वर्णी लागली तर संजूचा पत्ता कटच समजायचं.
advertisement
7/7
दरम्यान आता पाचव्या टी20 मध्ये संजू स्वत:ला सिद्ध करन वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली जागा फिक्स करतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : संजूला शेवटचा चान्स, बॅट चालली नाही तर बेंचवर बसावं लागणार, वर्ल्डकपसाठी रिप्लेसमेंट ठरली