TV ची फेमस अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? वयाच्या 38 व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली. त्यानंतर टीव्हीची आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
1/8

लाफ्टरक्विन भारती सिंह नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली. भारतीला पुन्हा एकदा मुलगा झाला. त्या मुलाचं तिनं नुकतंच बारसं देखील केलं. मुलाच्या बारशाचे फोटो देखील तिनं शेअर केलेत.
advertisement
2/8
भारती सिंहनं आता टेलिव्हिजनची आणखी एक फेमस अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे पण तिच्या तिसऱ्या मुलला जन्म देणार आहे.
advertisement
3/8
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची विनर रुबीना दिलीकनं चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रुबीना प्रेग्नंट असल्याचं तिनं स्वत: सांगितलं आहे. रुबीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती तिसऱ्यांदा आई होणार आहे.
advertisement
4/8
रुबीनाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांना यावर विश्वास बसलेला नाही. तर काहींना वाटले की ही कदाचित एका नवीन प्रोजेक्टची जाहिरात असेल असं वाटत आहे. रुबीनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात.
advertisement
5/8
रुबीना दिलीकनं शेअर केलेल्या व्हिडीओला तिनं एक ड्रामाटिक म्युझिक लावलं आहे. सुटकेचा श्वास सोडून तिने सांगितलं, 'मी प्रेग्नंट आहे'. पण या व्हिडीओमध्ये ती हे एकच वाक्य बोलली आहे त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
advertisement
6/8
व्हिडीओमध्ये तिचा पती अभिनव शुक्ला यांचा उल्लेख केला नाही यामुळे गोंधळ वाढला आणि अनेकांनी असा अंदाज लावला की ते एखाद्या जाहिरातीचा किंवा आगामी प्रोजेक्टचा भाग आहे. सध्या रुबीनाने या व्हिडीओ व्यतिरिक्त तिच्या प्रेग्नंसीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
advertisement
7/8
नोव्हेंबर 2023 मध्ये रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी जुळ्या मुली. जीवा आणि एधा अशी त्यांची नावं आहेत. रुबीना अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रुबीना आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट असेल तर ती आता तिच्या तिसऱ्या बाळाला जन्म देईल.
advertisement
8/8
रुबीना दिलीक आणि अभिनव शुक्ला यांनी 2008 मध्ये लग्न केलं. त्याआधी ते चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी बिग बॉस 14 मध्ये ते एकत्र दिसले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TV ची फेमस अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? वयाच्या 38 व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म!