Kitchen Tips : पावसाळ्यात गुळाला ओलाव्यापासून ठेवा दूर, वापरा 'हे' सोपे उपाय
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळ्यात हवामानात दमटपणा वाढल्यामुळे गुळ, साखर, मीठ इत्यादी पदार्थांना पाणी सुटते, ओलावा येतो. अशास्थितीत गुळाला ओलाव्यापासून दूर ठेवण्यासाठी काय करायला हवे हे जाणून घेऊयात.
advertisement
1/5

गूळ कॉटन किंवा मलमल कपड्यात बांधून ठेवा : पावसाळ्यात गुळाला थोडीशी जरी हवा लागली तरी ते लगेच खराब होते पाणी सुटते. पावसाळ्यात गूळ साठवायचा असेल तर गुळाला मलमल किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवा. यामुळे कॉटन किंवा मलमलचा कपडा गुळातील ओलावा शोषून घेईल. तसेच गूळ कापडात घट्ट बांधल्यामुळे बाहेरील हवेचा त्याच्याशी संपर्क होणार नाही.
advertisement
2/5
कडुलिंब किंवा आंब्याची पाने : गुळाला ओलावा किंवा कीड लागू नये यासाठी गुळाच्या डब्यात कोरडी कडुलिंब किंवा आंब्याची पाने ठेवा. यापानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे बॅक्टेरिया आणि फंगसपासून संरक्षण करण्यास मदत करते. कडुलिंब किंवा आंब्याची पाने गुळात ठेवण्यापूर्वी ती पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असल्याची खात्री करा.
advertisement
3/5
गुळाचे छोटे तुकडे करा : गुळाची मोठी ढेप असली तर ती साठवण्यासाठी त्याचे छोटे तुकडे करा. यामुळे त्यात आर्द्रता साठणार नाही आणि गूळ जास्त काळ टिकून राहील.
advertisement
4/5
काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा : गूळ साठवण्यासाठी पूर्वी मातीची भांडी साठवली जायची. ज्यामुळे नैसर्गिकरित्या गुळातील ओलावा शोषला जायचा. पावसाळ्यात गूळ खराब होऊ नये असे वाटत असेल तर काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात साठवा. किंवा चांगल्या फूड ग्रेड प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवा.
advertisement
5/5
पावसाळ्यात गूळ साठवताना त्याची योग्य काळजी घ्या. जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल आणि नंतर हवाबंद डब्यात ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : पावसाळ्यात गुळाला ओलाव्यापासून ठेवा दूर, वापरा 'हे' सोपे उपाय