7 Fruit Juice for High Bp: हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, प्या ‘हे’ ज्यूस, ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात
- Published by:Tushar Shete
Last Updated:
7 Fruit Juices to Control High Blood Pressure: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना डायबिटीस, ब्लडप्रेशरच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. तुम्हालाही उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तुम्हाला व्यायाम आणि जीवनशैलीत निश्चितच बदल करावे लागणार आहेत. असं म्हणतात फळं ही आरोग्यासाठी फायद्याची असतात. फळं खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येतं. जाणून घेऊया हाय ब्लडप्रेशरचा त्रास दूर करण्यासाठी कोणती फळं खाणं फायद्याचं ठरतं.
advertisement
1/7

पॅशन फ्रूट ज्याला कृष्णा फळ म्हणूनही ओळखलं जातं या फळाचा ज्यूस प्यायल्याने रक्तदाबाची समस्या कमी व्हायला मदत होते. पॅशन फ्रूट ज्यूसमध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.
advertisement
2/7
डाळिंबाच्या रसाच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक आणि कोलेस्टेरॉलचा साठत नाही. त्यामुळे रक्ताभिसरण नीट होऊन रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात.
advertisement
3/7
टोमॅटोत पोटॅशिअम चांगल्या प्रमाणात आढळून येतात. रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवून रक्तप्रवाह सुधारण्यात टोमॅटो फायद्याचे ठरतात. जपानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, सतत वर्षभर टोमॅटोचा रस खाल्ल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब दोन्ही रक्तदाब कमी झाल्याचं आढळून आलं होतं.
advertisement
4/7
द्राक्षांमध्ये पोटॅशियम, लाइकोपीन, फायबर आणि इतर नैसर्गिक पोषक घटक असतात. त्यामुळे द्राक्षांचा ज्यूस प्यायल्याने हृदयाचं आरोग्य सुधारून हृदयरोगांना दूर ठेवता येतं.
advertisement
5/7
चेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात, बीपी नियंत्रित करतात आणि मुक्त रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे जळजळ होऊ शकते.
advertisement
6/7
क्रॅनबेरीत असलेले पॉलीफेनॉल्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. कॅनबेरी खाल्ल्यानं किंवा कॅनबेरीचा ज्यूस प्यायल्याने शरीरातलं गुड म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढून बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
advertisement
7/7
बीटरूटच्या रसात नायट्रेट्स असतात. आपलं शरीर नायट्रेट्सचे रूपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये करतं. जे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करायला मदत करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
7 Fruit Juice for High Bp: हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, प्या ‘हे’ ज्यूस, ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात