TRENDING:

कतरिना-विक्कीच्या मुलासारखीच तुमच्या बाळाच्या नावाचीही होईल चर्चा; अतरंगी नाही, ठेवा ही अर्थपूर्ण संस्कृत नावं

Last Updated:
Katrina Kaif Vicky Kaushal Baby Name In Sanskrit : अतरंगी नावांच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांनी आपल्या बाळाचं नाव विहान असं ठेवलं आहे. जे संस्कृत नाव असून त्याचा अर्थही खास आहे. अशाच काही अर्थपूर्ण संस्कृत नावांची यादी.
advertisement
1/7
तुमच्या बाळाचं नावही ठरेल खास; कतरिना-विक्कीसारखं ठेवा युनिक पण अर्थपूर्ण नाव
आपल्या मुलाचं नाव हटके, युनिक, सगळ्यांपेक्षा वेगळं असावंं असं प्रत्येकाला वाटतं. पण या नादात पालक आपल्या मुलांची अशी अशी नावं ठेवत आहेत, की किती तरी लोक ट्रोल होऊ लागले आहेत. बाळाला युनिक, हटके नाव देण्याच्या नादात अतरंगी, विचित्र नावं दिली जात आहेत. त्यापैकी कित्येक नावांना काही अर्थही नसेल. सोशल मीडियावर तुम्ही अशा कितीतरी नावांचे व्हिडीओ पाहिले असतील.
advertisement
2/7
अतरंगी नावांच्या ट्रेंडमध्ये अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता विक्की कौशल यांनी मात्र आपल्या मुलाचं नाव साधं, सिम्पल पण तरी खास असं ठेवलं आहे. ज्यामुळे अतरंगी नावांमध्ये ते वेगळं ठरलं आहे, पण तितकंच अर्थपूर्णही आहे.  कतरिना आणि विक्कीच्या मुलाचं नाव आहे विहान.
advertisement
3/7
विहान हे नाव संस्कृतमधून आलं असून ते आशावाद आणि नवीन युगाचं प्रतीक आहे. या नावाचा मराठीत अर्थ पहाट, सकाळ, नवीन दिवसाची सुरुवात किंवा सूर्याचा किरण असा होतो. कतरिना-विक्कीच्या मुलासारखंच तुम्हालाही तुमच्या बाळाचं खास, युनिक, अर्थपूर्ण असं संस्कृत नाव ठेवायचं असेल तर ही दुर्मिळ अशा संस्कृत मुलामुलींच्या नावांची अर्थासहित यादी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
4/7
मुलींसाठी अतिशय दुर्मिळ संस्कृत नावं : इला – पृथ्वी, वाणीची देवी; कौशिकी – देवी पार्वती; तारिणी – तारून नेणारी, मुक्ती देणारी; विभा – प्रभा, तेज; सरयू – पवित्र नदी; शारिका – मैना पक्षी, ज्ञानाची प्रतीक.
advertisement
5/7
मुलांसाठी अतिशय दुर्मिळ संस्कृत नावं : अनय – मार्गदर्शक; अद्वय – द्वैत नसलेला एकमेव; तारक – उद्धार करणारा; नभय – आकाशासारखा; प्रांशु – उंच, विशाल; सत्त्व – शुद्धता, गुण.
advertisement
6/7
युनिक आणि आधुनिक पण संस्कृत मूळ : आर्यव – श्रेष्ठतेने भरलेला; व्योम – आकाश; रीत्विक – यज्ञ करणारा; ओजस्वी – तेजस्वी.
advertisement
7/7
वैदिक किंवा आध्यात्मिक छटा असलेली नावं : ऋग्वेद, यजुष – वेदाशी निगडित; श्लोक – स्तोत्र; प्रणव – ॐकार; तपस्वी – साधक
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कतरिना-विक्कीच्या मुलासारखीच तुमच्या बाळाच्या नावाचीही होईल चर्चा; अतरंगी नाही, ठेवा ही अर्थपूर्ण संस्कृत नावं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल