Jugad : डाळ शिजवताना कुकरमध्ये स्टीलची वाटी का ठेवतात? कारण ऐकाल तर म्हणाल अरे मला हे आधी का नाही माहित पडलं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की अनेक गृहिणी या डाळ शिजवताना कुकरमध्ये एक रिकामी स्टिलची वाटी ठेवतात? असं का केलं जातं किंवा याने काय फायदा होईल असा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
1/8

भारतीय स्वयंपाकात डाळ हा प्रत्येक घरात रोज बनणारा आणि जेवणाचा अविभाज्य भाग आहे. डाळ ही प्रथिनं आणि पोषणाने भरलेली असल्याने ती रोजच्या आहारात आवश्यक मानली जाते. आजकाल व्यस्त दिनक्रमामुळे बहुतेकजण डाळ शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. काही शिट्ट्यांमध्येच डाळ पटकन तयार होते.
advertisement
2/8
पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की अनेक गृहिणी या डाळ शिजवताना कुकरमध्ये एक रिकामी स्टिलची वाटी ठेवतात? असं का केलं जातं किंवा याने काय फायदा होईल असा प्रश्न अनेकांना पडतो.
advertisement
3/8
खरंतर डाळ शिजवताना एक त्रास सगळ्याच घरात जाणवतो. तो म्हणजे डाळ कुकरमध्ये शिजवताना शिट्टीमधून बाहेर उडते, ज्यामुळे हळदीचे डाग संपूर्ण स्वयंपाकघरात होतात आणि हाच त्रास टाळण्यासाठी एक अतिशय सोपी पण प्रभावी घरगुती युक्ती आहे वाटी.
advertisement
4/8
कुकर गरम होत असताना त्यामध्ये वाफेचा दाब झपाट्याने वाढतो. अशावेळी आत ठेवलेली स्टीलची वाटी दाब थोडासा नियंत्रणात ठेवते. त्यामुळे डाळ उकळून तयार होणारा फेस आणि पाणी वर चढत नाही आणि कुकरच्या शिट्टीतून बाहेरही येत नाही. अशा रीतीने गॅस आणि भिंती स्वच्छ राहतात आणि स्वयंपाकानंतर साफसफाईचं काम कमी होतं.
advertisement
5/8
स्वयंपाकतज्ज्ञांच्या मते, हा उपाय फक्त स्वच्छतेसाठीच नाही तर डाळ शिजवण्यासाठीही फायदेशीर आहे. वाटीमुळे कुकरमधील तापमान स्थिर राहतं, त्यामुळे डाळ हळूहळू आणि समान उष्णतेने शिजते आणि तिची चव आणि टेक्स्चर दोन्ही अधिक चांगले राहतात.
advertisement
6/8
अजून एक छोटा पण प्रभावी टिप : जर तुम्हाला वाटी ठेवायची नसेल, तर आणखी एक सोपा उपाय करून पाहाकुकरची शिट्टी लावण्याआधी तिच्या आतल्या बाजूला थोडंसं तूप लावा किंवा डाळीच्या पाण्यात अर्धा चमचा तूप टाका.
advertisement
7/8
तुपाची चिकटपणा वाफेचा दाब कमी करण्यात मदत करतो, त्यामुळे फेस वर चढत नाही आणि कुकरमधून पाणी बाहेर येत नाही. एवढंच नाही, तर डाळीचा स्वादही अधिक रुचकर होतो.
advertisement
8/8
दरवेळी डाळ बनवताना कुकरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे गॅस आणि भिंती घाण होतात हे सगळ्या गृहिणींना माहीत असतं. पण या छोट्या घरगुती युक्तीने तुम्ही हा त्रास पूर्णपणे टाळू शकता. एक छोटीशी स्टीलची वाटी किंवा थोडं तूप आणि तुमचं स्वयंपाकघर राहील स्वच्छ.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jugad : डाळ शिजवताना कुकरमध्ये स्टीलची वाटी का ठेवतात? कारण ऐकाल तर म्हणाल अरे मला हे आधी का नाही माहित पडलं