Vitamin C Benefits: हिवाळ्यात आजारी नाही पडायचं? मग खा ‘हे’ व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ मिळेल ताकद, राहाल फिट
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Vitamin C in Marathi: हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटिऑक्सिडंटयुक्त फळं आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. ‘व्हिटॅमिन सी’ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही तर त्वचेच्या आरोग्यतही सुधारणा होते. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणती फळं आणि भाज्या खाणं हिताचं ठरतं.
advertisement
1/7

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, मिनरल्स, फायबर्स आणि पोटॅशियम असतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करून गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात ब्रोकोलीची चांगली आवक होते. त्यामुळे हिवाळ्यात ब्रोकोली खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
advertisement
2/7
किवीच्या व्हिटॅमिन सी सोबतच दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे असतात. त्यामुळे संधीवात किंवा हिवाळ्यात उद्भवणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. याशिवाय किवी खाल्ल्याने कमकुवत पेशी मजबूत व्हायला मदत होते.
advertisement
3/7
आवळ्यात ‘व्हिटॅमिन सी’ सोबतत लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराला विविध पायदे मिळतात. ‘व्हिटॅमिन सी’ मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढयला मदत होते. तर लोहामुळे रक्ताची कमतरता भरून निघते.
advertisement
4/7
सिमला मिर्चीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन ई असतं. सिमला मिर्चीमध्ये इतर भाज्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन ई असतं. त्यामुळे हिवाळ्यात शिमला मिर्ची किंवा ढोबळी मिर्ची खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
5/7
लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. त्यामुळे हिवाळ्यात दररोज लिंबू पाणी किंवा लेमन टी पिणं फायद्याचं ठरतं. यामुळे तुमचं वजनही कमी व्हायला मदत होईल
advertisement
6/7
हिवाळ्यात पेरू खाणं फायद्याचं ठरतं. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी सोबतचं फायबर्स असतात. जे पचनक्रिया सुरळीत ठेवतात. वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही पेरू फायद्याचा आहे.
advertisement
7/7
संत्र्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’सोबत अँटिऑक्सिड्टस आणि फायबर्स आढळून येतात. अँटिऑक्सिड्टसमुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते. तर फायबर्समुळे अन्न चांगलं पचायला मदत होऊन पोट भरल्यासारखं राहतं. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vitamin C Benefits: हिवाळ्यात आजारी नाही पडायचं? मग खा ‘हे’ व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ मिळेल ताकद, राहाल फिट