Kitchen Tips : कोथिंबीर 7–8 दिवस ताजी कशी ठेवायची? जास्त कटकट नाही 'या' सोप्या घरगुती ट्रिक्सने ठेवा फ्रेश
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल की कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि हिरवीगार कशी ठेवायची, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
advertisement
1/9

वरण-भात असो, पोहे असो किंवा मिसळ... कोथिंबीरशिवाय या पदार्थांना पूर्णता येत नाही. कोंथीबीरच्या वासाने पदार्थाला चव तर येतेच, शिवाय ती रक्त वाढवण्यात देखील फायदेशीर आहे, पण गृहिणींची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे हीच कोथिंबीर ताजी कशी ठेवायची. बाजारातून कोथिंबीर आणली की ताजी असते पण दुसऱ्याच दिवशी ती सुकते किंवा काळी पडू लागते. अनेकदा तर फ्रिजमध्ये असूनही ती सडून जाते. अशा वेळी 'महागडी' कोथिंबीर फेकून देताना खूप वाईट वाटतं.
advertisement
2/9
जर तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल की कोथिंबीर आठवडाभर ताजी आणि हिरवीगार कशी ठेवायची, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. कोथिंबीर टिकवण्याच्या काही अशा सोप्या टिप्स आपण पाहणार आहोत, ज्या तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवतील.
advertisement
3/9
सुरुवातीची स्वच्छता महत्त्वाचीकोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर ती तशीच फ्रिजमध्ये ठेवू नका. सर्वात आधी जुडी मोकळी करा आणि त्यातील पिवळी पडलेली किंवा सडलेली पाने निवडून बाजूला काढा. एक खराब पान संपूर्ण कोथिंबीर खराब करू शकते.
advertisement
4/9
धुवावी की धुवू नये?अनेकांना सवय असते की कोथिंबीर आणल्याबरोबर ती धुवून ठेवतात. पण जर तुम्हाला ती जास्त दिवस टिकवायची असेल, तर न धुता साठवणे हा उत्तम पर्याय आहे. जर कोथिंबीर ओली असेल, तर ती कागदावर पसरवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. ओलावा हा कोथिंबीर सडण्याचे मुख्य कारण आहे.
advertisement
5/9
'या' ३ पद्धतींनी ठेवा कोथिंबीर ताजी:एअरटाईट डब्याचा वापर (Tissue Paper Method): एक प्लास्टिकचा किंवा काचेचा कोरडा डबा घ्या. त्याच्या तळाशी एक टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राचा कागद ठेवा. त्यावर निवडलेली कोथिंबीर ठेवा आणि वरून पुन्हा एक कागद लावून डबा बंद करा. हा कागद जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि कोथिंबीर 7-8 दिवस एकदम फ्रेश राहते.
advertisement
6/9
ग्लास किंवा बरणीचा वापर (Water Method): जर तुमच्याकडे फ्रिजमध्ये जागा असेल, तर एका ग्लासमध्ये थोडे पाणी घ्या. कोथिंबिरीची मुळे या पाण्यात बुडतील अशा बेताने कोथिंबीर त्यात उभी ठेवा. वरून एक प्लास्टिकची पिशवी सैलसर झाकून ठेवा. यामुळे कोथिंबीर झाडासारखी टवटवीत राहते.
advertisement
7/9
कॉटन बॅग किंवा सुती कापड: कोथिंबीर एका सुती कापडात किंवा कॉटनच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. कापडामुळे हवा खेळती राहते आणि कोथिंबीर लवकर खराब होत नाही.
advertisement
8/9
काही खास टिप्स:कोथिंबिरीची देठं पूर्णपणे कापू नका, देठांमध्ये जास्त चव आणि पोषक तत्वे असतात.फ्रिजच्या सर्वात खालच्या खाण्यात (Vegetable Crisper) कोथिंबीर ठेवणे जास्त सुरक्षित असते.जर टिश्यू पेपर ओला झाला असेल, तर 2-3 दिवसांनी तो बदलून दुसरा कोरडा कागद ठेवावा.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : कोथिंबीर 7–8 दिवस ताजी कशी ठेवायची? जास्त कटकट नाही 'या' सोप्या घरगुती ट्रिक्सने ठेवा फ्रेश