लग्न कराल तर जास्त जगाल! संशोधन सांगतंय लग्न केल्याने वाढतं वय, पण कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Benefits of wedding effect on life : 'शादी के लड्डू जो खाए वह भी पछताए और जो न खाए वह भी पछताए', असं म्हणतात. पण आता एका रिसर्चनंतर शादी के लड्डू जो न खाए वहही पछताए असंच म्हणावं लागेल. कारण लग्न केल्याने पुरुषांचं आयुष्य वाढतं, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
advertisement
1/7

भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमा म्हणा किंवा करवा चौथ, यादिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवते. पत्नीने उपवास केल्याने त्याचा पतीच्या वयावर किती परिणाम होतो हे माहिती नाही. पण पत्नीमुळे पतीचं आयुष्य वाढतं, हे मात्र संशोधनातून सिद्ध झालं आहे.
advertisement
2/7

हा अभ्यास कॅनडामधील वृद्धांवर आधारित होता. ज्यामध्ये 45 ते 85 वर्षे वयोगटातील लोकांच्या आरोग्याचा आणि जीवनशैलीचा 20 वर्षे अभ्यास करण्यात आला. यामध्ये विवाहित किंवा अविवाहित असण्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि वृद्धत्वावर काय परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
advertisement
3/7
अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की विवाहित पुरुष हे अविवाहित किंवा जोडीदाराशिवाय जगणाऱ्या पुरुषांपेक्षा निरोगी असतात. विवाहित पुरुष अविवाहित पुरुषांपेक्षा जास्त जगतात.
advertisement
4/7
या अभ्यासातून असंही दिसून येतं की लग्नाचा पुरुष आणि महिलांच्या वयावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. पुरुषांपेक्षा महिलांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे.
advertisement
5/7
विवाहित महिलांमध्ये वृद्धत्वाचा अनुभव अविवाहित महिलांपेक्षा फारसा वेगळा नव्हता. अभ्यासानुसार, घटस्फोटित किंवा विधवा महिलांची वृद्धत्वाची प्रक्रिया अविवाहित महिलांपेक्षा जास्त कठीण असते.
advertisement
6/7
या अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की वय वाढत असताना लग्नाचं महत्त्व केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावरदेखील परिणाम करतं.
advertisement
7/7
लग्नानंतर आयुष्य नरक बनतं, असं कित्येक विवाहित पुरुष म्हणतात आणि कित्येक पुरुषांना वाटतं. तुम्हीदेखील हे खरं मानत असाल तर या अभ्यासातील खुलासे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. कारण संशोधनानुसार लग्न पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरते. लग्नानंतर पुरुषांचं आयुष्य नरक बनत नाही, उलट ते वाढतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
लग्न कराल तर जास्त जगाल! संशोधन सांगतंय लग्न केल्याने वाढतं वय, पण कसं काय?