मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितली अशी एक गोष्ट, जी पुरुषांनी ताबडतोब सोडायला हवी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Men Habits : पुरुषांच्या अशा सवयी ज्या त्यांच्यासाठी घातक ठरत आहेत, मुंबईच्या डॉक्टरांनी त्या ताबडतोब सोडण्याचा सल्ला दिला आहे. बहुतेक पुरुषांना या सवयी आहेत.
advertisement
1/5

प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळ्या सवयी असतात. पण काही सवयी बहुतेकांमध्ये सारख्या असतात. अशीच एक सवय जी कित्येक पुरुषांमध्ये आहे, त्यामुळे ती सामान्य वाटते. पण डॉक्टरांनी ती पुरुषांना लगेच सोडायला सांगितली आहे.
advertisement
2/5
मुंबईतील फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. संदीप जोशी यांनी एका पॉडकास्टवर पुरुषांच्या प्रजनन आरोग्याबाबत माहिती देताना अशा सवयीबाबत सांगितलं आहे.
advertisement
3/5
फर्टिलिटी हा फक्त महिलांचा विषय नाही, पुरुषांचीही यात समान भूमिका असते. दररोजच्या छोट्या छोट्या सवयीही पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात.
advertisement
4/5
अनेक पुरुषांना माहिती नाही की स्मोकिंग, दारू पिणं, अनहेल्दी डाएट, आळशीपणा याचा स्पर्मवर परिणाम होतो या सवयींमुळे स्पर्म डीएनए डॅमेज होतात, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे पार्टनरचं आरोग्य चांगलं असलं तरी प्रजननात अडथळा येतो. ही मेल फर्टिलिटीची प्रमुख कारणं आहेत.
advertisement
5/5
मेल फर्टिलिटी सुधारण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग लगेच थांबवणं. पोषक आहार घेणं, नियमित एक्सरसाइझ करणं, हेल्दी लाइफस्टाईल आत्मसात केल्याने स्पर्म काऊंट आणि संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुधारू शकतं, असं डॉ. जोशी यांनी सांगितलं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितली अशी एक गोष्ट, जी पुरुषांनी ताबडतोब सोडायला हवी