TRENDING:

वर्षभरात कधी ही घ्या पुरणपोळीचा आस्वाद; एकाच ठिकाणी मिळत आहेत तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकार

Last Updated:
पुण्यात खास पुरणपोळी घर सुरू झालं आहे. यामध्ये तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकारच्या पुरणपोळ्या खायला मिळतात.
advertisement
1/5
वर्षभरात कधी ही घ्या पुरणपोळीचा आस्वाद; एकाच ठिकाणी तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकार
महाराष्ट्रात सणासुदीला पुरणपोळीचा घरो घरी मान असतो. ताटातील गोडसर पुरणपोळी जेवणाची लज्जत वाढवते. पण, अनेकदा पुरणपोळी वर्षातल्या मोजक्याच सणांना केली जाते. मात्र, आता <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> खास पुरणपोळी घर सुरू झालं आहे. यामध्ये तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकारच्या पुरणपोळ्या खायला मिळतात.
advertisement
2/5
पुण्यातील अपर्णा सांभारे यांनी पुरणपोळी घर सुरू केले आहे. या घरामध्ये अंजीर पुरणपोळी, ड्रायफ्रूट पुरणपोळी, खोबरे पुरणपोळी, खजूर पुरणपोळी, बदाम पुरणपोळी, 50-50, शुगर फ्री, चॉकलेट,गुलकंद तिखट डाळ,फणस असे 24 पेक्षा जास्त प्रकार येथे मिळतात.
advertisement
3/5
या ठिकाणी पुरणपोळी रव्यापासून बनवल्या जातात. यामध्ये फक्त 5 टक्केच मैदा वापरला जातो. पुरणपोळी सोबत कटाची आमटी देखील दिली जाते. तसेच अजून उकडीचे मोदक, ओल्या नारळाची करंजी ही भेटते, असं अपर्णा सांभारे यांनी सांगितले.
advertisement
4/5
सर्वांची आवडती अशी ही पुरणपोळी बनवण अवघड आहे. परंतु याची टेस्ट देखील तितकीच गोड आहे. त्यामुळेच जे खवय्ये आहेत त्यांना 365 दिवस ही पुरणपोळी आता कधी खाता येणार आहे. या ठिकणी पुरणपोळीची किंमत 30 रुपयांपासून 70 रुपये आहे, असंही अपर्णा सांभारे यांनी सांगितले.
advertisement
5/5
पुरणपोळी घर हिंजवडी छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ म्हातोबा मंदिर येथे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
वर्षभरात कधी ही घ्या पुरणपोळीचा आस्वाद; एकाच ठिकाणी मिळत आहेत तब्बल 24 पेक्षा जास्त प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल