Benefits of Hirda: पृथ्वीवरचं अमृत आहे ‘हिरडा’, आरोग्यदायी हिरड्याचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित वापराने दूर पळतील आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of myrobalan commonly known as Hirda :आयुर्वेदिक औषधांमध्ये हिरडा हे सर्वोत्तम औषध मानलं जातं. हिरड्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याला पृथ्वीवरचं अमृत असंही म्हणतात. हिरडा ही एकमात्र अशी औषधी वनस्पती असेल की प्रत्येक ऋतूत ती वेगळ्या पदार्थासोबत घेतली तर त्याचे अधिक फायदे आपल्याला मिळतात. उदा. पावसाळ्यात सैंधव मीठासोबत, बरोबर, थंडीत साखरेसोबत,उन्हाळ्यात मधाबरोबर घेतल्यास फार फायद्याचं ठरतं. जाणून घेऊयात हिरडा वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे.
advertisement
1/7

हिरड्यात व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळून येतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि घशांच्या आजारांवर हिरडा गुणकारी ठरतं. कोमट पाण्याच हिरड्याची पावडर उकळून ते पाणी प्यायल्यास फायदा होतो.
advertisement
2/7
हिरड्यात असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे ते सांधेदुखी किंवा डोकेदुखीच्या आजारावर गुणकारी ठरतं. मायग्रेनसारख्या डोकेदुखीच्या गंभीर आजारावार हिरडा गुणकारी आहे.
advertisement
3/7
हिरडा हे हिरव्या रंगाचं फळ जरी असलं तरीही त्याला येणाऱा फुलांचा मोहोर हा गुलाबी रंगाचा असतो. हिरड्यात आढळून येणारं व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आजारांसाठी फायद्याचं आहे. योग्य त्या प्रमाणात हिरड्याची पावडर पाण्यात टाकून घेतल्यास मोतीबिंदू, डोळ्यांचा नंबर वाढणं असे दृष्टीदोष दूर करण्यात हिरडा फायद्याचा ठरू शकतो.
advertisement
4/7
अपचानाच्या आजारावर हिरडा प्रचंड गुणकारी आहे. एका पाण्यात पाण्यात हिरड्याचे फळ उकळून ते पाणी प्यायल्यास, पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ व्हायला मदत होते. यामुळे अपचन, पोटफुगी, बद्धकोष्ठतेसारखे आजार बरे होतात.
advertisement
5/7
मूत्रविकार किंवा किडन्यांच्या आजारावरही हिरडा गुणकारी आहे. हिरड्यामुळे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकायला मदत होते. त्यामुळे किडनीचं आरोग्य सुधारायला मदत होते.
advertisement
6/7
हिरड्यात अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे विविध दंतविकार किंवा तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्येवर हिरडा परिणामकारक ठरू शकतो. गरम पाण्यात हिरडा टाकून ते पाणी प्यायल्यास किंवा त्या पाण्याने गुळण्या केल्याल तोंडाची दुर्गंधी दूर होईलच मात्र त्यासोबत विविश घशांच्या आजारांनाही दूर ठेवता येईल.
advertisement
7/7
जुन्या जखमा बऱ्या करण्यासाठी हिरडा फायद्याचा ठरू शकतो. हिरड्या पाण्याने जखम पुसून स्वच्छ करून त्यावर हिरड्याची पूड टाकल्यास ती जखम लवकर भरून यायला मदत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Hirda: पृथ्वीवरचं अमृत आहे ‘हिरडा’, आरोग्यदायी हिरड्याचे आहेत ‘इतके’ फायदे, नियमित वापराने दूर पळतील आजार