Potato Peels Uses : बटाट्याच्या सालींचा असा वापर तुम्ही कधीच पहिला नसेल! वाचा 5 भन्नाट फायदे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Potato peels uses and benefits : बटाट्यांच्या साली काढून आपण सहसा फेकून देतो मात्र तुम्हाला माहित आहे का? या सालींचा उपयोग स्टीलची भांडी, शूज आणि चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी, वनस्पतीला खत म्हणून आणि केसांची काळजी घेण्यासाठीही बटाट्याच्या साली फायद्याच्या आहेत. चला जाणून घेऊया याचा वापर कसा करावा.
advertisement
1/5

बटाट्याच्या साली फेकून देण्याऐवजी तुम्ही घाणेरडी भांडी उजळवण्यासाठी त्यांचा वापर करू शकता. स्टील किंवा तांब्याच्या भांड्यांवर जिद्दी डाग पडले असतील, तर बटाट्याच्या साली थोड्या बेकिंग सोड्यासोबत घेऊन त्याने भांडी घासून घ्या. काही मिनिटांतच भांडी स्वच्छ होतील.
advertisement
2/5
तुम्ही घरगुती फेशियल क्लींजरसाठी बटाट्याच्या साली देखील वापरू शकता. तुम्ही त्यांचा वापर तुमच्या चेहऱ्यावर ओलावा आणि चमक परत आणण्यासाठी करू शकता. हे करण्यासाठी बटाट्याच्या साली बारीक करा, थोडे दूध घाला आणि त्या तुमच्या चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी धुवा. तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
advertisement
3/5
तुमचे शूज आणि चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या साली वापरू शकता. बटाट्याच्या सालींमधील स्टार्च डाग दूर करण्यास मदत करतो. तुमच्या शूज किंवा चांदीच्या दागिन्यांवर त्याची साले घासून कोरड्या कापडाने पुसून घ्या. यामुळे तुमचे काळे झालेले चांदीचे दागिने उजळतील.
advertisement
4/5
तुम्हाला बागकाम करायला आवडत असेल किंवा तुमच्या घरात फुलांची झाडे असतील तर बटाट्याच्या साली उपयुक्त ठरू शकतात. तुम्ही तुमच्या झाडांसाठी खत बनवू शकता. वाळलेल्या बटाट्याच्या साली मिक्सरमध्ये बारीक करून मातीत मिसळा, ज्यामुळे झाडांना भरपूर पोषण मिळते.
advertisement
5/5
बटाट्याच्या साली केसांची काळजी घेण्यासाठी देखील वापरता येतात. बटाट्याच्या साली पाण्यात उकळा, थंड करा आणि त्या पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस काळे, मजबूत आणि चमकदार होतील. अशाप्रकारे भाजी केल्यानंतर बटाट्याच्या साली फेकून न देता तुम्ही त्याऐवजी त्याचा असा वापर करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Potato Peels Uses : बटाट्याच्या सालींचा असा वापर तुम्ही कधीच पहिला नसेल! वाचा 5 भन्नाट फायदे