'मी जगेन की नाही याची खात्री नव्हती', 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर अपघात, पालकांनी सोडलेली आशा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Serial Actress : 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि मालिका विश्वात तिला मिळालेली वागणूक याबद्दल अगदी मोकळेपणाने सांगितले.
advertisement
1/10

मराठी मालिका </a>विश्वात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्कृतींवर आधारित विषय हाताळले जातात. अशातच काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका आली, ज्यातून कोकणातील मालवणी भाषेतून एक आगळी वेगळी हॉरर कहाणी सर्वांसमोर आली." width="750" height="563" /> मुंबई: मराठी मालिका विश्वात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्कृतींवर आधारित विषय हाताळले जातात. अशातच काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका आली, ज्यातून कोकणातील मालवणी भाषेतून एक आगळी वेगळी हॉरर कहाणी सर्वांसमोर आली.
advertisement
2/10
या मालिकेत मालवणी भाषेचा गोडवा तर होताच, पण त्याचबरोबर कोकणातील अंगावर काटा आणणारी गोष्टही होती. ही मालिका म्हणजे २०१६ साली टीव्हीवर आलेली रात्रीस खेळ चाले.
advertisement
3/10
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका त्या काळात तुफान गाजली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना तिने अक्षरशः वेड लावलं. इतकंच नाही, तर या मालिकेने मराठी मनोरंजन विश्वाला नवे चेहरेही दिले. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं, प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिलं.
advertisement
4/10
अशातच या मालिकेच्या पहिल्या पर्वात सरिता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी मुकादम हिने एका चॅनेलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि मालिका विश्वात तिला मिळालेली वागणूक याबद्दल अगदी मोकळेपणाने सांगितले.
advertisement
5/10
इट्स मज्जा या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने तिच्या बालपणीचा एक अत्यंत गंभीर आणि भावनिक प्रसंग सांगितला, ज्याबद्दल ऐकून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील.
advertisement
6/10
मुलाखतीत अश्विनीने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, "मी ज्युनिअर केजीत असताना भाजले होते आणि ते भाजणे खूप जास्त होते. ही मुलगी वाचू शकेल, अशी आशा सगळ्यांनीच सोडली होती!"
advertisement
7/10
इतकंच नाही, तर तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्ष लागले. ती पुढे म्हणाली, "खरंच मी हात वर टेकून परत आले. दोन-अडीच वर्षांनंतर माझ्या जखमा बऱ्या झाल्यावर मी पुन्हा शाळेत जाऊ शकले." आयुष्यातील या भीषण अनुभवावर तिने हिमतीने मात केली.
advertisement
8/10
इंडस्ट्रीतील तिच्या प्रवासाबद्दल बोलताना अश्विनीने एका कटू आठवणीही सांगितल्या. 'रात्रीस खेळ चाले' ही तिची पहिली मालिका होती. ती म्हणाली, "एक-दोन मोठी नावं आहेत, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, 'ही काही अभिनेत्री होणार नाही. तिनं दिग्दर्शन करावं किंवा दुसरं काहीतरी करावं.' पण मला आतून माहीत होतं, मी अभिनेत्री आहे आणि मी अभिनेत्रीच होणार. मी बॉडी शेमिंगही सहन केलं आहे."
advertisement
9/10
२०१५ मध्ये तिने अभिनयात काहीतरी करायचे ठरवले. ज्या शाळेत ती शिकवत होती, तिथेही तिने सांगितले की, 'मी माझ्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवेन, नाही जमलं तर परत येईन.' यावेळी ती प्रायोगिक नाटक करत होती.
advertisement
10/10
ऑडिशनबद्दल बोलताना ती म्हणाली, "एका ओळखीमुळे मला ३० डिसेंबरला ऑडिशनला बोलावले. पण त्या दिवशी माझ्या नाटकाची तालीम असल्याने मी नकार दिला. नंतर २७ जानेवारीला मला संतोष अयाचितचा फोन आला. त्याने सांगितले की, 'मी तुझा फोटो चॅनलला दाखवला आणि त्यांनी तुला सिलेक्ट केलंय. फक्त थोडं कोकणी बोलावं लागेल आणि ३ महिने कोकणात राहावे लागेल.' मी दुसऱ्या दिवशी लगेच होकार कळवला."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी जगेन की नाही याची खात्री नव्हती', 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर अपघात, पालकांनी सोडलेली आशा