
सोलापूर: आज कालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे वजन वाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. वजन वाढायला लागलं तर कमी करण्यासाठी काही जण औषधांचा वापर करतात पण याच औषधांमुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात हे आपल्याला माहित आहे का ? या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर अमय पुरंदरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 03, 2025, 18:00 ISTसोलापूर - वंधत्वाचा समाधान करणाऱ्या जोडप्यांसाठी उपयुक्त आणि प्रगत वैद्य प्रक्रिया म्हणजे आयवीएफ पण आयवीएफ चागलं की वाईट?आयवीएफ करताना वय किती असावे? असे अनेक प्रश्न मनामध्ये असतात या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉक्टर दिनेश बलकवडे उपसचिव उपसचिव महाराष्ट्रराज्य स्त्री आरोग्य संस्था यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 03, 2025, 18:42 ISTजालना : आपल्या आरोग्याबाबत आपण नेहमीच सजग असतो. शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम राखणं देखील तेवढेच आवश्यक असतं. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ही एक सर्वसामान्य समस्या प्रत्येकामध्येच आढळून येते. स्त्री असो किंवा पुरुष पिंपल्स येत असतात. पिंपल्स आल्यानंतर अनेक जण वेगवेगळे उपाय करून ते घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चुकीचे उपाय अवलंबल्यास आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं याबद्दच आपल्याला सौंदर्य तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 03, 2025, 17:29 ISTमुंबई : हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसांत खारीक खाणे अत्यंत पौष्टिक मानले जाते. तुम्ही खारकेचे अनेक आरोग्यदायी फायदे ऐकले असतील, परंतु खारकेचे तूपात भिजवून सेवन केल्यास त्याचे आश्चर्यकारक परिणाम अनुभवता येतात. यामुळे फक्त रोगप्रतिकारक शक्तीच मजबूत होत नाही, तर पचनशक्तीही वाढते. खारीक तूपासोबत खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. खारीक खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे याबद्दल मुंबईतील आहार तज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 03, 2025, 16:59 ISTबीड : गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार जाणवू लागले आहेत. एकीकडे दिवसा उन्हाची तीव्रता वाढत असताना संध्याकाळनंतर गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अॅलर्जी यांसारख्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, हवामानातील अचानक होणारे बदल आणि शरीरातील इम्युनिटी यातील असंतुलन यामुळे हे आजार वेगाने पसरत आहेत.
Last Updated: November 03, 2025, 16:30 IST