टप्प्याटप्प्याने घरांचे वितरण
यापूर्वीच या प्रकल्पांतर्गत 556 पुनर्वसन घरांचा ताबा रहिवाशांना देण्यात आला आहे. तसेच पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात सदनिकांचे वितरण होणार आहे. एप्रिलमध्ये 845, मेमध्ये 574 आणि जुलैमध्ये 271 अशा एकूण 2246 सदनिका वर्षाअखेरीस वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
advertisement
नायगाव आणि परळ प्रकल्पालाही गती
नायगाव बीडीडी प्रकल्पातही कामांना गती मिळाली असून मे 2026 मध्ये 537 पुनर्वसन सदनिकांचे वितरण होणार आहे. परळ येथील प्रकल्पात जून 2026 मध्ये 547 सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे, तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 दरम्यान आणखी 342 सदनिकांचे वितरण प्रस्तावित आहे.
म्हाडाने तिन्ही प्रकल्पांमध्ये वेगाने कामे सुरू ठेवली असून डिसेंबर 2026 पर्यंत एकूण 4888 पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचा मानस आहे. पुढे डिसेंबर 2027 पर्यंत हा आकडा 6246 वर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दीर्घकालीन नियोजनानुसार, डिसेंबर 2029 पर्यंत एकूण 15,593 पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचा ताबा रहिवाशांना देण्याचा संकल्प आहे.
पुढील टप्प्यांचे नियोजन
सध्या वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तिन्ही प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे प्रगतीपथावर आहेत. वरळीत 4823, नायगावमध्ये 1074 आणि ना. म. जोशी मार्ग प्रकल्पात 1582 अशा एकूण 7550 सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. एकूणच 9815 सदनिकांचे काम सुरू असून त्यापैकी सुमारे 63 टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, उर्वरित 5778 सदनिकांच्या बांधकामालाही ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पांना आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षे जुन्या चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना आता आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज घरात राहण्याची संधी मिळणार आहे.






