TRENDING:

Accident News: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रकला धडकली क्रूझर, इंदापुरातील भीषण अपघातात ३ ठार, PHOTOs

Last Updated:
Accident News: पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
1/6
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रकला धडकली  क्रूझर, इंदापुरातील भीषण अपघातात ३ ठार,  PHOTOs
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसी परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातानं परिसरात एकच खळबळ उडाली. क्रुझर गाडीचा टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
2/6
क्रुझर वाहनातून काही कामगार प्रवास करत होते. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर एमआयडीसीजवळ येताच गाडीचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुसऱ्या लेनमध्ये गेली. याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकवर क्रुझरची जोरदार धडक झाली.
advertisement
3/6
धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. काहीजण जखमी झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
advertisement
4/6
या अपघातात प्रमोद बाळासाहेब खवळे राहणार मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे (चालक) तर शशांक कोटीया (ग्वालियर, मध्य प्रदेश) विजयसिंह राजपूत (त्रिलोकनगर मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
5/6
अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
advertisement
6/6
तसेच अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, तसेच टायर फुटण्यामागील कारण याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Accident News: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रकला धडकली क्रूझर, इंदापुरातील भीषण अपघातात ३ ठार, PHOTOs
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल