Real Vs Fake Egg : सावधान! बाजारात सर्रास विकले जातायत 'नकली अंडी'? घरच्या घरी असं करा खरं खोटं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही फसवे विक्रेते साध्या पांढऱ्या अंड्यांना रंग लावून, त्यांना 'देशी' किंवा 'नैसर्गिकरित्या तयार झालेली' अंडी म्हणून जास्त भावाने विकत आहेत. ही फसवणूक कशी होते आणि अशा बनावट अंड्यांपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
1/10

अंड्यामध्ये प्रोटिन असतं त्यामुळे ते खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. वजन कमी करणाऱ्यांसाठी अंड हा चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच तर संडे असो वा मंडे दररोज अंड खाण्यासाठी तज्ज्ञ सांगतात. याच कारणामुळे अंड एक सुपर फूड आहे. हल्ली लोक खूप आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या आहारात अंड्याचा समावेश करण्याला सुरुवात केली आहे.
advertisement
2/10
वाढत्या मागणीमुळे अंडी उत्पादनात भारताने मोठी प्रगती केली आहे, परंतु याच मागणीचा फायदा घेऊन काही व्यापारी आणि विक्रेते बाजारात भेसळयुक्त अंडी (Adulterated Eggs) विकत आहेत, जी ग्राहकांसाठी एक मोठी चिंता आहे.
advertisement
3/10
काही फसवे विक्रेते साध्या पांढऱ्या अंड्यांना रंग लावून, त्यांना 'देशी' किंवा 'नैसर्गिकरित्या तयार झालेली' अंडी म्हणून जास्त भावाने विकत आहेत. ही फसवणूक कशी होते आणि अशा बनावट अंड्यांपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
4/10
सामान्य अंड्याला 'देशी' कसे बनवतात?सामान्य फार्मवर तयार होणारी पांढरी अंडी मोठ्या प्रमाणात आणि कमी दरात उपलब्ध असतात. या अंड्यांवर स्कॅमर्स चहाचा काढा, केशरी रंग (Saffron) किंवा काही प्रकारचे पेंट वापरून रंग चढवतात. या रंगांमुळे पांढऱ्या अंड्याचे कवच लालसर किंवा गडद तपकिरी (Deep Brown) दिसू लागते, ज्यामुळे ग्राहक त्याला उच्च दर्जाचे, जास्त पोषक तत्व असलेले 'देशी' अंडे समजून लगेच खरेदी करतात.
advertisement
5/10
लोक हिवाळ्यात आपल्या मुलांना अंडी मोठ्या प्रमाणात खायला देत असतात. या मागे त्यांची अशी समजुत असते की यामुळे मुलांचा थंडी-खोकल्यापासून बचाव होतो, परंतू अशाच गोष्टींचा हे फसवे लोक फायदा घेतात. काही विक्रेते 'कृत्रिम' (Artificial) नावाखाली लहान आकाराची (सुमारे २५-३० ग्रॅम) आणि गडद केशरी रंगाच्या बलक (Yolk) असलेली अंडी जास्त भावाने विकतात.पण सत्य हे आहे की, सर्व अंड्यांमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे सारखीच असतात; कवच किंवा बलकाचा रंग बदलून पोषण मूल्यामध्ये फरक पडत नाही. आपण केवळ पैसे देऊन फसवले जातो.
advertisement
6/10
फसवणूक टाळण्यासाठी 'हे' ३ सोपे घरगुती टेस्ट कराअंड्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत (Lab) जाण्याची गरज नाही. घरी अगदी सहजपणे तुम्ही खालील तीन चाचण्या करू शकता:
advertisement
7/10
2. मिठाच्या पाण्यात भिजवण्याची चाचणी (Salt Water Test):एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ (Salt) टाका. त्यानंतर संशयास्पद अंडे त्या पाण्यात ठेवा, काही वेळातच जर पाण्याचा रंग पिवळा, केशरी किंवा तपकिरी झाला, तर ते निश्चितच भेसळयुक्त (Adulterated) अंडे आहे. अस्सल अंड्यातून कोणताही रंग पाण्यात मिसळत नाही.
advertisement
8/10
3. वजन आणि बलक (Yolk) तपासणी:शिजवण्यापूर्वी, अंडे हातात घेऊन त्याचे वजन तपासा. बाहेरच्या फार्ममधून आलेले कच्चे अंडे (जे रंगवलेले नाही) 'देशी' अंड्यापेक्षा थोडे हलके असू शकते.
advertisement
9/10
अंड्यातील फसवणुकीचा खरा पुरावा तोडल्यावर मिळतो: जर बलक गडद केशरी किंवा खूपच गडद रंगाचा असेल, तर ते अंडे कदाचित रंगवलेले किंवा कृत्रिम असू शकते. नैसर्गिक आणि ताज्या अंड्याचा बलक सामान्यतः फिकट पिवळा (Light Yellow) किंवा हलक्या केशरी रंगाचा असतो.
advertisement
10/10
शेवटी, देशी (खेड्यात तयार झालेले) आणि फार्मवर तयार झालेले, दोन्ही प्रकारचे अंडे प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि बी12 सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. कमी दरात उपलब्ध अंड्यांना रंग लावून चढ्या दरात विकले जाणे ही केवळ फसवणूक आहे. त्यामुळे यापुढे, अंडे खरेदी करताना केवळ रंगावर न जाता, ते नेहमी विश्वसनीय स्त्रोतांकडूनच खरेदी करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Real Vs Fake Egg : सावधान! बाजारात सर्रास विकले जातायत 'नकली अंडी'? घरच्या घरी असं करा खरं खोटं