Coconut Rituales : हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत? परंपरा की अंधश्रद्धा, काय आहे कारण?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का की असं का? महिला नारळ का फोडत नाहीत, यामागे नक्की काय कारण आहे?
advertisement
1/10

कोणत्याही पूजा-अर्चनेत किंवा शुभकार्यात नारळ देवाला अर्पण केला जातो. नवीन कामाची सुरुवात करताना किंवा कोणतेही शुभ संकल्प करताना नारळ फोडले जाते. भारतात तर अनेक जेवणाच्या पदार्थांमध्ये नारळ टाकला जातो. पण या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की प्रसंग काहीही असोत, पण भारतीय महिला या नारळ फोडत नाहीत.
advertisement
2/10
पण कधी विचार केलाय का की असं का? महिला नारळ का फोडत नाहीत, यामागे नक्की काय कारण आहे?
advertisement
3/10
महिला नारळ का फोडत नाहीत? ही केवळ रूढी आहे की यामागे काही ठोस धार्मिक, वैज्ञानिक किंवा प्रतीकात्मक कारण दडलेले आहे. आज याच प्रश्नाचं सखोल उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
4/10
हिंदू धर्मात नारळाला 'श्रीफळ' म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ 'देवाचे फळ' असा होतो. नारळ फोडणे हे 'अहंकार नष्ट करणे' आणि 'स्वत:ला ईश्वरासमोर समर्पित करणे' याचं प्रतीक मानलं जातं. नारळाचं कठीण कवच हे मानवी अहंकार आणि बाह्य जगाचे प्रतिनिधित्व करतं, तर त्यातील शुभ्र, पवित्र पाणी आणि खोबरं हे शुद्ध आत्मा किंवा बुद्धीचं प्रतीक आहे.
advertisement
5/10
महिला नारळ न फोडण्यामागे तीन प्रमुख संकल्पना प्रचलित आहेत. यापैकी काही श्रद्धांवर आधारित आहेत, तर काही प्रतीकात्मक आहेत:
advertisement
6/10
हिंदू धर्मात नारळाला 'बीज' (Seed) किंवा उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या आतला भाग, विशेषतः खोबरं, प्रजनन क्षमता (Fertility) दर्शवतो. महिलांना साक्षात 'सृजनशक्ती' (Procreation Power) म्हणून पाहिलं जातं. एका मान्यतेनुसार, बीज स्वरूपातील नारळ फोडणे हे सृजनशक्तीला नष्ट करण्यासारखे आहे, म्हणूनच महिला नारळ फोडणे टाळतात.
advertisement
7/10
दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी मानवी किंवा पशुबळी देण्याची प्रथा होती, जी नंतर नारळ फोडण्याच्या प्रथेने बदलण्यात आली. महिला या 'बळी' प्रक्रियेशी जोडल्या जाऊ नयेत, यासाठी त्यांना नारळ फोडण्याची परवानगी दिली जात नाही.
advertisement
8/10
नारळाचे कवच अतिशय कठीण असते. ते फोडण्यासाठी शारीरिक शक्ती आणि कठोरता लागते. पारंपरिकरित्या, धार्मिक कार्यात महिलांना सौम्यतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते, तर नारळ फोडण्याची कठोर क्रिया पुरुषांसाठी योग्य मानली जाते.
advertisement
9/10
काही धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे महिलांना नारळ फोडण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण त्याचे थेट संबंध 'बलिदाना'शी जोडले जातात.
advertisement
10/10
आजच्या आधुनिक काळात, अनेक भागांमध्ये महिलांना नारळ फोडण्यावर कोणताही आडकाठी राहिलेली नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून, आता अनेक ठिकाणी महिला मोठ्या आत्मविश्वासाने आणि भक्तीभावाने पूजा-विधीमध्ये नारळ फोडताना दिसतात. मात्र, आजही अनेक पारंपरिक मंदिरांमध्ये आणि कुटुंबांमध्ये जुनी रूढी पाळली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Coconut Rituales : हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत? परंपरा की अंधश्रद्धा, काय आहे कारण?