TRENDING:

Beer : बिअर पिण्याची परफेक्ट पद्धत, ड्रिंकची मजा होईल दुप्पट, अनेकांना माहितीच नाही

Last Updated:
Right way to drink beer : मद्यप्रेमींमध्ये बिअर ही सर्वात आवडती ड्रिंक आहे. पण बहुतेक लोकांना बिअर पिण्याची योग्य पद्धत माहित नसते. त्यामुळे बिअर पिण्याची मजा किंवा आनंद जसा मिळायला हवा तसा मिळत नाही.
advertisement
1/7
बिअर पिण्याची परफेक्ट पद्धत, ड्रिंकची मजा होईल दुप्पट, अनेकांना माहितीच नाही
मद्यप्रेमींमध्ये बिअर ही सर्वात आवडती ड्रिंक आहे. असं म्हणतात की बिअर जितकी थंड तितकी चांगली लागते. पण खरंतर बिअर जास्त थंड केल्याने तिची चव कमी होते. खूप थंड बिअर चव लपवून ठेवते, तर हलक्या थंडीमुळे चव वाढते. हलक्या बिअर 3-5 अंश सेल्सिअस तापमानावर आणि गडद बिअर 7-10 अंश सेल्सिअस तापमानावर दिल्या जातात.
advertisement
2/7
प्रत्येक प्रकारच्या बिअरसाठी वेगवेगळे ग्लास डिझाइन केले आहेत. उदाहरणार्थ लेगरसाठी उंच ग्लास योग्य मानला जातो आणि स्टाउट किंवा एलसाठी रुंद तोंडाचा ग्लास योग्य मानला जातो. ग्लास बिअरचा सुगंध आणि फेस प्रभावीपणे टिकवून ठेवण्यास मदत करतात. बहुतेक लोक हे पाळत नाहीत, त्यामुळे बिअर पिण्याचा खरा आनंद गमावतात.
advertisement
3/7
ग्लासमध्ये बिअर ओतताना ग्लास थोडासा झुकवून ओता ज्यामुळे फेस आणि गॅस नियंत्रित राहिल. थेट ग्लासमध्ये ओतल्याने जास्त फेस येईल आणि बिअरच्या चवीवर परिणाम होईल.
advertisement
4/7
बरेच लोक रिकाम्या पोटी बिअर पितात. पण ते हानिकारक आहे. त्यामुळे अॅसिडिटी आम्लता, गॅस आणि रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते. बिअर पिण्यापूर्वी हलका नाश्ता किंवा जेवण करणं चांगलं. बिअर पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री, जेव्हा शरीर विश्रांती घेतं.
advertisement
5/7
बिअर एका घोटात संपवू नये. एक एक घोट प्यावी. हळूहळू प्यायल्याने त्याची चव आणि सुगंध चाखता येतो. शरीरावर त्याचा जास्त परिणाम होतो, लवकर नशा चढते.
advertisement
6/7
बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात करणं चांगलं. जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्यसन, वजन वाढणे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यकृत, पोट आणि मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतात. पुरुषांसाठी दिवसाला एक पिंट आणि महिलांसाठी अर्धा पिंट बिअर पुरेशी आहे.
advertisement
7/7
(हा लेख फक्त सर्वसामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे. दारू आरोग्यासाठी घातकच आहे. न्यूज18मराठी त्याचं समर्थन करत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देशही नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beer : बिअर पिण्याची परफेक्ट पद्धत, ड्रिंकची मजा होईल दुप्पट, अनेकांना माहितीच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल