TRENDING:

मोबाईलमुळे जगावर मोठं संकट! जगातील निम्म्या लोकसंख्येला मोठा धोका

Last Updated:
Risk of mobile : मोबाईलचा सतत वापर करताय आताच सावध व्हा. कारण यामुळे संपूर्ण जगासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. एका संस्थेने याबाबत इशारा दिला आहे.
advertisement
1/7
मोबाईलमुळे मोठं संकट! जगातील निम्म्या लोकसंख्येला मोठा धोका
मोबाईल म्हणजे कित्येकांसाठी आयुष्यच म्हणावं लागेल. दिवसाची सुरुवात मोबाईलने आणि दिवसाचा शेवटही मोबाईलनेच. पण याच मोबाईलमुळे जगावर मोठं संकट आलं आहे.
advertisement
2/7
जगातील निम्म्या लोकसंख्येला मोबाईलमुळे मोठा धोका आहे. एका संस्थेने हा इशारा दिला आहे आणि संपूर्ण जगाला सावध केलं आहे.
advertisement
3/7
मोबाइल, टॅबलेट, संगणकाच्या पडद्यामागे जग धावत असताना डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. स्क्रीनच्या अतिवापरामुळे मायोपियासारखे आजार उद्भवत आहेत. जगातील 30% लोक सध्या या दृष्टीदोषाने ग्रस्त आहेत.
advertisement
4/7
2050 पर्यंत जगातील सुमारे 50% लोकांना हा त्रास सहन करावा लागू शकतो, असा इशारा इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटने दिला आहे. इन्स्टिट्यूटने 2000 ते 2050 पर्यंतच्या मायोपियाच्या रुग्णांची आकडेवारी दिली आहे.
advertisement
5/7
31% मुलांना मायोपिया आहे. जे किशोरवयीन गटात आहेत. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांकडून होणाऱ्या मोबाइलच्या अतिरेकी वापराबाबत नेत्ररोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
6/7
2000, 2010, 2020 साली अनुक्रमे 1.4, 2, 2.6 अब्ज लोकसंख्येला मायोपिया होता, टक्केवारीत हे प्रमाण 22.9, 28.3, 33.9 आहे.
advertisement
7/7
या आकडेवारीचा विचार करता 2030, 2040, 2050 मध्ये अनुक्रमे 3.4, 4.1, 4.8 अब्ज लोकसंख्येला मायोपिया होण्याचा धोका आहे. टक्केवारीत हे प्रमाण 39.9, 45.2, 49.8 आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
मोबाईलमुळे जगावर मोठं संकट! जगातील निम्म्या लोकसंख्येला मोठा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल