TRENDING:

Shivrajyabhishek Sohala Wishes : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा शुभेच्छा संदेश, आठवू शिवरायांचा प्रताप!

Last Updated:
Shivrajyabhishek Sohala Wishes In Marathi : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहोळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पार पडला होता. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा दिवस कुणीही विसरणार नाही असाच आहे. तेव्हा या दिवशी काही खास संदेश सोशल मीडियाद्वारे मित्र परिवाराला पाठवू शकता.
advertisement
1/7
आठवू शिवरायांचा प्रताप! शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा शुभेच्छा
''होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा"
advertisement
2/7
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास, ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती; पोवाडे, गौरव गीतांमधून, आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती, शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
न भूतो न भविष्यति असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा, या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा, या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन, शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
advertisement
4/7
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं … दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी … अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच” काळीज हवं... शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा...
advertisement
5/7
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास, रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस; मुघलांना वाटत होती ज्यांची भीती, असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती', शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा; डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shivrajyabhishek Sohala Wishes : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा शुभेच्छा संदेश, आठवू शिवरायांचा प्रताप!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल