TRENDING:

Lonavala photoshoot : लोणावळ्याची 'ही' ठिकाणं प्री वेडिंग शूटसाठी आहेत बेस्ट! अजिबात मिस करू नका हे डेस्टिनेशन

Last Updated:
Lonavala pre-wedding photoshoot spots : लग्नाच्या आधी केले जाणारे फोटोशूट म्हणजेच प्री वेडिंग फोटोशूट हल्ली खूप प्रचलित आहे. महाराष्ट्रातील लोणावळा हे असेच एक खास ठिकाण आहे, जे डोंगराळ प्रदेशाचे सौंदर्य, ऐतिहासिक किल्ले आणि शांत तलावांमुळे 'प्री-वेडिंग' फोटोशूटसाठी एक उत्तम पर्याय ठरते. तुम्हीही तुमचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोणावळ्याचा विचार करत असाल, तर येथे आम्ही 5 सर्वात सुंदर ठिकाणांची माहिती देत आहोत. ही ठिकाणं तुमच्या फोटोंना रॉयल आणि रोमँटिक लूक देतील.
advertisement
1/7
लोणावळ्याची ही ठिकाणं प्री वेडिंग शूटसाठी आहेत बेस्ट! मिस करू नका हे डेस्टिनेशन
प्री वेडिंग फोटोशूट हा प्रत्येक जोडप्यासाठी एक अविस्मरणीय सोहळा असतो. या फोटोशूटसाठी निसर्गरम्य आणि आकर्षक ठिकाण निवडणे खूप महत्त्वाचे असते, जिथे प्रेम आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील लोणावळा हे असेच एक खास ठिकाण आहे. चला पाहूया इथे कोणकोणत्या ठिकाणी फोटोशूट केले जाऊ शकते.
advertisement
2/7
पवना तलाव : लोणावळ्याजवळील पवना तलाव 'प्री-वेडिंग' फोटोशूटसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. शांत पाणी, दूरवरचे डोंगर आणि हिरवीगार वनराई यामुळे येथील प्रत्येक फ्रेम खूप रोमँटिक दिसते. सनराईज किंवा सनसेटला येथील दृश्ये अविश्वसनीय असतात, जे तुमच्या फोटोंना एक जादुई टच देतात. येथे निसर्गाच्या कुशीत सुंदर क्षण कॅमेराबद्ध करता येतात.
advertisement
3/7
लोणावळा तलाव : लोणावळा शहराच्या अगदी जवळ असलेले हे तलाव शांत आणि सुंदर आहेत. हे तलाव कमी गर्दीचे असल्याने जोडप्यांना शांतपणे आपले फोटोशूट पूर्ण करता येते. इथली किनाऱ्यावरची झाडे आणि स्वच्छ पाणी तुमच्या छायाचित्रांना एक शांत आणि कलात्मक लूक देईल.
advertisement
4/7
भुशी धरण : पावसाळ्यात भुशी धरणाचे सौंदर्य ओसंडून वाहत असले तरी, फोटोशूटसाठी येथे वर्षभर सुंदर लँडस्केप उपलब्ध असते. धरणाचे चढ-उतार असलेले दगडी बांधकाम आणि खळाळणारे पाणी तुमच्या फोटोंना एक डायनॅमिक आणि जीवंत लूक देते. येथे पाणी आणि दगडांचा मिलाफ तुमच्या 'प्री-वेडिंग' अल्बमला एक खास ओळख देईल.
advertisement
5/7
राजमाची किल्ला : तुम्हाला ऐतिहासिक भव्यता आणि साहसी अनुभव हवा असेल, तर राजमाची किल्ल्याचा परिसर उत्तम आहे. हा किल्ला लोणावळ्यापासून थोड्याच अंतरावर आहे. येथील जुने बांधकाम, हिरवीगार दरी आणि ढगांचा खेळ तुमच्या फोटोंना अद्भुत लूक देतो. किल्ल्याच्या उंच ठिकाणावरून दिसणारे विहंगम दृश्य तुमच्या रोमँटिक पोझेसला आणखी खास बनवतात.
advertisement
6/7
टायगर पॉइंट : तुम्हाला लोणावळ्यातील हिरव्यागार दऱ्या आणि पर्वत पहायचे असतील तर तुम्ही टायगर पॉइंटला जाऊ शकता. पाऊस असल्यास तुम्ही इथे पावसाच्या थेंबांमध्ये रोमँटिक फोटो काढू शकता किंवा झाडांमधून जाणाऱ्या सूर्यप्रकाशात फोटो घेऊ शकता. हा पॉईंट लोणावळ्यापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lonavala photoshoot : लोणावळ्याची 'ही' ठिकाणं प्री वेडिंग शूटसाठी आहेत बेस्ट! अजिबात मिस करू नका हे डेस्टिनेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल