Travel : रोमँटिक ट्रिपचा करताय प्लॅन? भारतातील 'या' 5 ऑफबीट ठिकाणी ताऱ्यांखाली घालवा अविस्मरणीय रात्र
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे पाहणेही दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे, हल्ली 'ऍस्ट्रो ट्यूरिज्म' हा नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. भारतात अशी अनेक ऑफबिट ठिकाणं आहेत, जिथे आकाशाची स्पष्टता अद्भुत असते.
advertisement
1/7

शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे पाहणेही दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे, हल्ली 'ऍस्ट्रो ट्यूरिज्म' हा नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. भारतात अशी अनेक ऑफबिट ठिकाणं आहेत, जिथे आकाशाची स्पष्टता अद्भुत असते. या ठिकाणांना भेट देण्यासाठी योग्य वेळ आणि बजेट किती हे जाणून घेऊ.
advertisement
2/7
हनले, लडाख : हनले हे भारताचे पहिले 'डार्क स्काय रिझर्व्ह' म्हणून ओळखले जाते. अत्यंत उंचीवर आणि प्रकाश प्रदूषणापासून दूर असल्यामुळे, येथे मिल्की वेचे अप्रतिम दृश्य दिसते. मे ते ऑक्टोबर या कालावधीत तुम्ही इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या आकाशाचा आनंद घेऊ शकता. प्रवासासह एकूण खर्च ₹30,000 ते ₹45,000+ इतका होऊ शकतो.
advertisement
3/7
स्पीति व्हॅली, हिमाचल प्रदेश : लडाखपेक्षा अधिक सहज पोहोचता येणारे हे ठिकाण मिल्की वे पाहण्यासाठी उत्कृष्ट आहे. इथले विरळ वातावरण आणि उंचावरील स्थान स्पष्ट आकाश देते. एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान तुम्ही इथे भेट देऊ शकता. दिल्लीहून 5 दिवसांसाठी साधारण खर्च ₹15,000 ते ₹25,000 इतका होतो.
advertisement
4/7
कच्छचे रण, गुजरात : या ठिकाणी क्षितिजावर कोणतेही अडथळे नसल्यामुळे आणि हवामान कोरडे असल्यामुळे येथील रात्र काळोखी असते. त्यामुळे मिल्की वे तुम्ही स्पष्ट पाहू शकता. नोव्हेंबर ते मार्च येथील वातावरण थंड आणि कोरडे असते त्यामुळे या दरम्यान तुम्ही नक्कीच जावं. 4 दिवसांसाठी ₹12,000 ते ₹20,000 इतका खर्च येतो.
advertisement
5/7
नील बेट, अंदमान : समुद्रकिनाऱ्याजवळचे हे ठिकाण शहर आणि जमिनीच्या प्रकाशापासून दूर आहे. दक्षिण गोलार्धातील तारे पाहण्यासाठी हे एक दुर्मिळ ठिकाण आहे. नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान स्वच्छ समुद्र आणि हवामान असते. विमानाचे तिकीट वगळता ₹20,000+ इतका खर्च होऊ शकतो.
advertisement
6/7
कूर्ग/कोडगू, कर्नाटक : दक्षिण भारतात असलेल्या कूर्गमधील कमी लोकवस्तीमुळे येथील रात्री शांत आणि काळोख्या असतात. डोंगर आणि कॉफीच्या बागांभोवती तारांगण पाहण्याचा अनुभव खास असतो. ऑक्टोबर ते मार्च पावसाळ्यानंतरचे स्वच्छ आकाश इथलं वातावरण आणखी स्पेशल बनवते. 4 दिवसांसाठी ₹10,000 ते ₹18,000 इतका खर्च होतो.
advertisement
7/7
सर्वोत्तम वेळ आणि खर्चाचे नियोजन: तारांगण पाहण्यासाठी अमावस्येच्या रात्री प्रवास करा. खर्च कमी करण्यासाठी मोठ्या हॉटेल्सऐवजी होमस्टे निवडा आणि शक्य असल्यास स्थानिक खगोलशास्त्रज्ञांच्या गटासोबत प्रवास करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Travel : रोमँटिक ट्रिपचा करताय प्लॅन? भारतातील 'या' 5 ऑफबीट ठिकाणी ताऱ्यांखाली घालवा अविस्मरणीय रात्र