TRENDING:

Vat Purnima 2024 Ukhane : वडाला घालते फेरे... वटपौर्णिमेनिमित्त खास नवीन आणि सुंदर उखाणे

Last Updated:
vat purnima ukhane in marathi : वटपौर्णिमेला वटवृक्षाची मनोभावे पूजा करून पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया नटून थटून छान तयार होऊन वडाची पूजा करतात. नैवेद्य दाखवतात आणि खास उखाणेही घेतात. नवविवाहित वधूला तर उखाण्यांचा खास आग्रह धरला जातो. अशावेळी पटकन उखाणा सुचत नाही आणि सणला धरुन तर नाहीच नाही मग त्यासाठी टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला काही खास सोपे आणि झटपट उखाणे सांगणार आहोत.
advertisement
1/9
वडाला घालते फेरे... वटपौर्णिमेनिमित्त खास नवीन आणि सुंदर उखाणे
आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला उपवास,.....रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
advertisement
2/9
देवाकडे मागणे मागते, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा …रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
advertisement
3/9
वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,.... रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.
advertisement
4/9
वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,.... रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.
advertisement
5/9
मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर!
advertisement
6/9
सण आहे आज वटपौर्णिमेचा,......रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.
advertisement
7/9
कांजीवरम साडी, बनारसी खण …रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण
advertisement
8/9
वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात, … रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.
advertisement
9/9
वट पौर्णिमेचे व्रत, निष्ठेनं करते, ....रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vat Purnima 2024 Ukhane : वडाला घालते फेरे... वटपौर्णिमेनिमित्त खास नवीन आणि सुंदर उखाणे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल