Health Risk Of The Day : पावसाच्या पाण्यात भिजल्याने काय होतं? शरीरावर कसा परिणाम होतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Effect of rain water on body health : सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अनेकांना पावसात भिजायला आवडतं. पावसात भिजण्याचे काही परिणाम आणि दुष्परिणामही आहेत.
advertisement
1/9

पावसात भिजल्याने काय होतं, शरीर, आरोग्यावर कसा परिणाम होतो, त्याचे दुष्परिणाम काय याबाबत बरेच संशोधनही झाले आहेत.
advertisement
2/9
जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल सायकोलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यात भिजल्याने चिंता आणि तणाव कमी होऊ शकतो. जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसॉर्डरमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यात भिजल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
advertisement
3/9
जर्नल ऑफ कॉस्मेटिक्स, डर्मोटॉलॉजिकल सायसेन्स अँड अॅप्लिकेशन्समध्ये प्रकाशित अभ्यासानसार पावसाचं पाणी त्वचा साफ करून त्वचा तजेलदार बनवतं. यातील प्राकृतिक घटक त्वचा निरोगी बनवण्यात मदत करतात.
advertisement
4/9
याउलट जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यातील काही घटक त्वचेला नुकसान पोहोचवून शकतात. यामुळे त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
5/9
पीएलओएस वनमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यातील काही घटक रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत करण्यात मदत करतात.
advertisement
6/9
तर सीडीसीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यात बॅक्टेरिया आणि व्हायरस असू शकतात जे आजाराचं कारण बनू शकतात.
advertisement
7/9
अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिश हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यानुसार पावसाच्या पाण्यात भिजल्याने सर्दी आणि खोकला होऊ शकतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच श्वासासंबंधी समस्या आहेत, त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.
advertisement
8/9
एनआयएचमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार पावसाच्या पाण्यात भिजल्याने शरीराचं तापमान कमी होऊ शकतं, ज्यामुळे हाइपोथर्मिया होऊ शकतो. वृद्ध आणि शारीरिकरित्या कमजोर लोकांना याचा धोका अधिक आहे.
advertisement
9/9
एकंदर काय तर पावसाच्या पाण्याचे भिजण्याचे जितके फायदे, तितकेच दुष्परिणामही आहेत. त्यामुळे पावसात भिजताना जपूनच.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : पावसाच्या पाण्यात भिजल्याने काय होतं? शरीरावर कसा परिणाम होतो?