Crime News : अहमदनगर : मंदिरातील तब्बल 30 लाखांचं सिंहासन पळवलं; चोरटे CCTV कॅमेरात कैद; गावकऱ्यांचा मोठा निर्णय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Crime News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगावमध्ये सुद्रिकेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाली आहे. (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे पहाटेच्या सुमारास गावचे ग्रामदैवत सुद्रिकेश्वर महाराजांच्या मंदिरात जबरी चोरी झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
2/5
अज्ञात चोरट्यांनी सुद्रिकेश्वर महाराजाच्या सिंहासनाभोवती लावली गेलेली जवळ पास 40 किलो वजनाच्या चांदीची चोरी केली आहे. याची किंमत अंदाजे 30 लाखांपर्यंत आहे.
advertisement
3/5
सकाळी काही गावकरी दर्शनासाठी गेले असता त्याच्या हा प्रकार लक्ष्यात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर दिली.
advertisement
4/5
माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे फौज फाटा घेऊन घटनास्थळी हजर झाले व श्वान पथकास पाचारण केले.
advertisement
5/5
पारगावचे सुद्रिकेश्वर महाराजांचे असणारे हे ग्रामदैवत एक जागृत दैवत मानले जाते. मात्र, अश्या ठिकाणी घडलेल्या चोरीचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गावातील सर्व दुकानें बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Crime News : अहमदनगर : मंदिरातील तब्बल 30 लाखांचं सिंहासन पळवलं; चोरटे CCTV कॅमेरात कैद; गावकऱ्यांचा मोठा निर्णय