Ahmednagar accident : अहमदनगमध्ये एसटीचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल, मोठी जीवितहानी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अहमदनगरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. एसटी बस आणि इर्टिगा गाडीचा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. साहेबराव कोकणे प्रतिनिधी :
advertisement
1/7

अहमदनगरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. एसटी बस आणि इर्टिगा गाडीचा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
2/7
एसटी बस आणि इर्टिगाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसरात हा अपघात झाला.
advertisement
3/7
इर्टिगा गाडी आणि श्रीगोंदावरून शिरूरला जाणाऱ्या एसटीचा भिषण अपघात झाला, या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
advertisement
4/7
दत्तात्रेय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बाबुराव मडके, हरी तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण नन्नवरे अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चार प्रवाशांची नावं आहेत.
advertisement
5/7
तर या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, त्यांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
6/7
विठ्ठल गणपत डोके ,रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस,रोहिदास हरिभाऊ सांगळे अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.
advertisement
7/7
हा अपघात एवढा भयंकर होता की यामध्ये चार चाकीचा संपूर्ण चुराडा झाला आहे. तर एसटी बसचं देखील मोठं नुकसानं झालं आहे. एसटीमधून प्रवास करणारे 16 प्रवासी सुखरूप आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar accident : अहमदनगमध्ये एसटीचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्तामांसाचा चिखल, मोठी जीवितहानी