Ajit Pawar : अजित पवारांच्या यात्रेत स्वागत कमान कोसळून महिला जखमी; घटनेचे पहिले PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajit Pawar : अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत स्वागत कमान पडून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. (हरिष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

राज्यातील अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरे आणि प्रचारयात्रांचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार देखील जनसन्मान यात्रेतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
advertisement
2/5

विशेष करुन यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा महिला मतदारांवर डोळा असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठीच त्यांनी स्वतःच्या जॅकेटपासून संपूर्ण प्रचारयात्राच गुलाबी रंगात केली आहे.
advertisement
3/5
जनसन्मान यात्रेचं कोपरगाव तालुक्यात आगमन झालं. यावेळी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी लावलेली कमान पडून एक महिला जखमी झाली.
advertisement
4/5
अजित पवार कोपरगावमध्ये येण्यापूर्वी स्वागत कमान पडून ही घटना घडली. सुदैवाने यात महिला थोडक्यात वाचली. यामध्ये तिला डोक्याला दुखापत झाली आहे.
advertisement
5/5
दरम्यान, अजित पवारांचे कोपरगाव शहरात आगमन झाले आहे. गोदावरी नदीच्या पुलावरून जनसंवाद यात्रा मुख्य कार्यक्रमाकडे रवाना झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ajit Pawar : अजित पवारांच्या यात्रेत स्वागत कमान कोसळून महिला जखमी; घटनेचे पहिले PHOTOS