अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; बस पलटी, अपघाताचे पहिले photos समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
संगमनेरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाली.
advertisement
1/5

संगमनेरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. राहुरीकडून संगमनेरकडे जाणारी बस पलटी झाली. या बसमधून मोठ्या संख्येनं शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करत होते.
advertisement
2/5
विद्यार्थ्यांसोबत काही नागरिक देखील या बसमध्ये होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही बस राहुरीहून आश्वी शिबलापूर मार्गे संगमनेरकडे निघाली होती. मात्र पिंपरणे गावात पोहोचल्यानंतर बसचा रॉड तुटला. बसचा रॉड तुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
advertisement
4/5
या बसमध्ये साधारण चाळीस विद्यार्थ्यांसह काही नागरीक प्रवास करत होते, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
advertisement
5/5
जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; बस पलटी, अपघाताचे पहिले photos समोर