Vidarbh Special Food : तर्रीदार वांग्याची भाजी, वरण; विदर्भ स्पेशल 'रोडगे' कधी खाल्ले का?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
अकोला, प्रतिनिधी/कुंदन जाधव : आपण आता पर्यंत अनेक पार्ट्या पहिल्या असतील, बॅचलर पार्टी, बर्थडे पार्टी, हुरडा पार्टी. पण अकोल्यात अनोखी पार्टी रंगलीय. ती म्हणजे 'रोडगे पार्टी'. आता रोडगे म्हणजे नेमके काय? आणि ते एवढे प्रदिढ काय आहेत.चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
advertisement
1/8

तर्रीदार वांग्याची भाजी, वरण आणि सोबत कोशिंबीर किंवा नुसते सॅलड.. हे पाहून तोंडाला पाणी सुटल असेल ना? नक्कीच सुटणार... कारण ही आहे विदर्भाच्या अकोल्यातील प्रसिद्ध 'रोडगे' पार्टी...
advertisement
2/8
आता पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पार्ट्या पहिल्या असतील. पण ही अनोखी आणि पारंपरिक 'रोडगे' पार्टी आहे अकोल्यातील निमकंडे कुटुंबीयांची. चला पाहूया रोडगे कशापासून बनवले जातात.
advertisement
3/8
'रोडगे' बनवण्यासाठी गव्हाचं पिठाचे गोळे तयार केले जातात आणि हे गोळे रानगौऱ्या पेटवून त्या विस्तावात टाकून भाजले जातात. ह्या रोडग्यांचा वांग्याची भाजी, वरण आणि गावरान तुपा सोबत आस्वाद घेतला जातो.
advertisement
4/8
फास्टफूडच्या काळात जुन्या परंपरा लुप्त होत असताना, या खमंग "रोडग्याचा" आस्वाद अकोलेकरांनी घेतलाय. 'रोडगे' हा पदार्थ विदर्भातील काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे.
advertisement
5/8
काही खास कार्यक्रमानिमित्त किंवा नवस फेडण्यासाठी ह्या 'रोडगे' पार्टीचं आयोजन केले जाते. 'रोडगे' पार्टी ही धार्मिक स्थळीच आयोजित केली जाते. दृश्यातील हे आमंत्रण अकोल्यातील हरिहर निमकंडे यांच्या नवस फेडण्याचं होतं.
advertisement
6/8
या 'रोडगे' पार्टीचे निमंत्रक अकोल्यातील हरिहर निमकंडे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, आधुनिक फास्टफूड पेक्षा जुन्या परंपरेतील 'रोडगे' शरीरासाठी खूप पोषक आहेत. शरीराला आवश्यक कॅलरीच यातून मिळत असतात.
advertisement
7/8
याठिकाणी रोडगे पार्टीच्या आमंत्रणाची वाट आतुरतेने पहिली जाते आणि या पार्टीला दुरदुरुन लोक आवर्जून हजार होतात. धार्मिक स्थळी या पार्टीच आयोजन केल्याने अध्यात्मिकतेची ओढसुद्धा लागते.
advertisement
8/8
प्रतिभा निमकंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील परंपरा आजही टिकवून ठेवणं कठीण आहे. पण विदर्भातील ही 'रोडगे' पार्टी आजही प्रसिद्ध असल्याने या पार्टीने आपलं अस्तित्व फास्टफूडच्या या काळात ठिकवून ठेवलय...
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अकोला/
Vidarbh Special Food : तर्रीदार वांग्याची भाजी, वरण; विदर्भ स्पेशल 'रोडगे' कधी खाल्ले का?