beed accident : बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू , 1 गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बीडच्या परळी शहरात रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
1/5

बीडच्या परळी शहरात रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
2/5
परळी शहरातील चेंबरी विश्रामगृहाजवळ दोन बाईकची समोरासमोर धडक झाली. याचवेळी रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून मोठी गाडी गेली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
advertisement
3/5
या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे, जखमी व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
4/5
जब्बार सय्यद आणि अजय चौधरी असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. अपघातांच नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
advertisement
5/5
दरम्यान अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही बाजूनं वाहानाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बीड/
beed accident : बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू , 1 गंभीर जखमी