भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात, जागेवरच गेले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
RT Deshmukh Car Accident Death: माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला लातूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
advertisement
1/5

बीड जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते तथा माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला लातूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/5
तुळजापूर-लातुर महामार्गावर औसा तालुक्यातील बेलकुंड पाटीजवळ अपघात झाला आहे. अपघातात आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला.
advertisement
3/5
भरधाव वेगात लातूरच्या दिशेने येताना एका कठड्याला धडकून फॉर्च्युनर गाडी उलटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाडीतील दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
advertisement
4/5
परळी आणि पंचक्रोशीतील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आर टी देशमुख अर्थातच जीजा यांची ओळख होती.
advertisement
5/5
त्यांचे निधन झाल्याचे कळताच भाजप नेत्यांनी आणि इतरही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात, जागेवरच गेले