TRENDING:

ट्रिपलसीट दुचाकीची शिवशाही बसला धडक, एसटीच्या चाकाखाली आल्याने तिघांचा जागेवर मृत्यू; धडकी भरवणारे फोटो

Last Updated:
एस.टी.महामंडळाची शिवशाही बस छत्रपती संभाजीनगरवरुन मलकापूरकडे जातान हा अपघात झाल्याची माहिती आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
advertisement
1/7
ट्रिपलसीट दुचाकीची शिवशाही बसला धडक, एसटीच्या चाकाखाली आल्याने तिघांचा  मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील करडी गावाजवळ धरणावरील पुलावर शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्या आहेत.
advertisement
2/7
छत्रपती संभाजी नगर रोडवर एस.टी.महामंडळाच्या शिवशाही बसला समोरुन येणाऱ्या मोटारसायकलस्वारांची जोरदारपणे धडक बसली आणि दुचाकी थेट बसच्या चाकाखाली आली.
advertisement
3/7
एस.टी.महामंडळाची शिवशाही बस छत्रपती संभाजी नगरवरुन मलकापूरकडे जातान हा अपघाच झाला. तर मोटारसायकल ही धाड गावाकडून येत होती
advertisement
4/7
या अपघातात अंकुश सुखदेव पाडळे (वय 32) , कैलास साहेबराव शिंदे (वय 30),रवि सुरेश चंदनशिव (वय 23) या तीन जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
5/7
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर तात्काळ नागरीकांनी धाव घेऊन तातडीने पोलीसांना व रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.
advertisement
6/7
घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. पोलीसांनी तातडीने त्या तिघा तरुणांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
7/7
पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा केला आहे. व घटनेची नोंद घेतली आहे. तातडीने एस टी बसला पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ट्रिपलसीट दुचाकीची शिवशाही बसला धडक, एसटीच्या चाकाखाली आल्याने तिघांचा जागेवर मृत्यू; धडकी भरवणारे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल