Weather Alert: विजा कडाडणार, छ. संभाजीनगर ते बीड धो धो कोसळणार, मराठवाड्याला यलो अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रासह मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/6

बंगालच्या उपसागरातील 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात मागील पाच दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज, 29 ऑक्टोबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/6
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना आज, बुधवारी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह जोरदार पाऊस होईल.
advertisement
3/6
जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील ऑक्टोबर हिटचे चटके कमी झाले आहेत. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस वरून 27 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे.
advertisement
4/6
मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या पाच जिल्ह्यांत वेगवान वारे वाहून विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे.
advertisement
5/6
दरम्यान, मराठवाड्यात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर 2 दिवसांनी पावसाची तीव्रता कमी होणार असून 31 ऑक्टोबर अखेर पाऊस काढता पाय घेऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना पुढील 2 दिवस काळजी घेण्याची गरज आहे.
advertisement
6/6
Weather Alert: मराठवाड्यावर पुन्हा संकटाचे ढग, 48 तास धोक्याचे, छ. संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: विजा कडाडणार, छ. संभाजीनगर ते बीड धो धो कोसळणार, मराठवाड्याला यलो अलर्ट