TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यात वारं फिरलं, गुरुवारी थंडी, उन्ह की पाऊस? पाहा हवामान अपडेट

Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात सातत्यान बदल जाणवत आहेत. आता ऐन थंडीच्या काळात उन्हाचा पारा वाढत असल्याचे चित्र आहे.
advertisement
1/5
मराठवाड्यात वारं फिरलं, गुरुवारी थंडी, उन्ह की पाऊस? पाहा हवामान अपडेट
राज्यातील कोकणासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. काही भागात तापमान वाढत आहे. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. आज 27 नोव्हेंबर रोजी बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसभर कोरडे, स्वच्छ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळ-संध्याकाळ थंडगार वार्‍यांसह हवेतील गारवा जाणवेल, तर दुपारी सूर्याचा ताप किंचित वाढू शकतो. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. जालना जिल्ह्यातही तापमानात घसरण होऊ शकते.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमानाचा चढ-उतार अधिक जाणवू शकतो. बीडमध्ये विशेषतः अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला थंडी काही प्रमाणात जाणवेल तर दुपारी तापमान वाढल्याने उबदारपणात थोडी वाढ होईल. आज बीडचा पारा 29 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता असून रात्री किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर स्थिर राहू शकते.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही हवामान स्थिर राहील. लातूरमध्ये दिवसा तापमान अंदाजे 29 अंश, तर रात्री 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज असून गारवा कधी वाढेल तर कधी कमी होईल अशी स्थिती राहू शकते.
advertisement
5/5
मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी गुरुवारी हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिलेला नाही. तरीही काही ठिकाणी सौम्य ढगाळ वातावरण दिसू शकते. त्यामुळे रात्री- सकाळी थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे. दिवसभरात हवामानात अचानक बदल होऊ शकतो, म्हणून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात वारं फिरलं, गुरुवारी थंडी, उन्ह की पाऊस? पाहा हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल