Weather Alert: स्वेटर सोडा, आता AC जोडा, मराठवाड्यात पुन्हा हवापालट, थंडी नव्हे, IMD चा वेगळाच अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. आता थंडीचा जोर कमी झाला असून किमान तापमान वाढलं आहे.
advertisement
1/5

राज्यातील कोकण आणि मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेले 2-3 दिवस काही भागात अचानक ढगाळ हवामान झालं होतं. आता पुन्हा हवापालट झाली असून ऐन हिवाळ्यात मराठवाड्याचा पारा चढला आहे. तर काही भागात मात्र अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांचा मंगळवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी जाणवेल, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका लागणार आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर किमान पारा 14 अंश सेल्सिअस राहणार आहे. तसेच तापमानात घट झाल्यामुळे जालन्यात थंडी कमी असणार आहे.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमानात कमी - जास्त होण्याचे प्रमाण आहे. बीड जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात घट होवून थंडी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी दाट गारवा आणि रात्री बोचरी थंडीही जाणवू शकते. मात्र दुपारच्या सुमारास हवेत किंचित उबदारपणा वाढेल. बीडमध्ये आज 25 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर रात्रीचे किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. तर धाराशिव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणार असून लातूरमध्ये देखील हवामानात बदल जाणवतील.
advertisement
5/5
मराठवाड्यातील आठपैकी कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा अलर्ट जारी केलेला नाही. मात्र मराठवाड्यातील क्वचित ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळं कुठं थंडी तर कुठं उन्हाचे चटके जाणवणार आहेत. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: स्वेटर सोडा, आता AC जोडा, मराठवाड्यात पुन्हा हवापालट, थंडी नव्हे, IMD चा वेगळाच अलर्ट