TRENDING:

Weather Alert: थंडीच्या काळात सूर्याला ताप, मराठाड्यात पुन्हा हवापालट, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather update: मराठवाड्यात ऐन थंडीच्या दिवसातं पारा चढला आहे. काही ठिकाणी तापमान बत्तीशीपार गेले आहे.
advertisement
1/5
थंडीच्या काळात सूर्याला ताप, मराठाड्यात पुन्हा हवापालट, आजचं हवामान अपडेट
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यासह मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली आहे. गेल्या 48 तासांपासून हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहे . त्यामुळे मराठवाड्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. साधारणतः सर्वत्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. आज 26 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह 8 जिल्ह्यांचा हवामान जाणून घेऊ.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सकाळ-संध्याकाळ थंडी काही प्रमाणात जाणवेल, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, तर किमान पारा 16 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
3/5
बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडी नाहीशी झाली आहे. सकाळी मात्र गारवा आणि रात्री बोचरा वारा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या सुमारास सूर्यप्रकाश राहील. तसेच बुधवारी बीडमध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/5
लातूर आणि धाराशिव भागातही हवामान कोरडे असेल. दिवसभर आकाश स्वच्छ आणि वाऱ्यांचा जोर आधीच्या तुलनेने कमी राहणार आहे. लातूरमध्ये आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल.
advertisement
5/5
आज बुधवार रोजी मराठवाड्यातील आठपैकी कोणत्याही जिल्ह्याला कुठलाही 'सतर्कतेचा अलर्ट' देण्यात आला नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. थंडी कमी झाल्यामुळे नागरिकांना आता दुपारच्या वेळेला एसी, तर रात्री देखील कुलर, फॅनचा वापर करावा लागत आहे. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: थंडीच्या काळात सूर्याला ताप, मराठाड्यात पुन्हा हवापालट, आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल